राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पक्षातील फुटीनंतर हा पक्ष कुणाचा. हा वाद निर्माण झाला आहे. अजित पवार गटाने या पक्षावर दावा केला आहे, तर शरद पवार गटानेही हा आमचाच पक्ष आहे, असे म्हटले आहे. हा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आला आहे. गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी झाली. यावेळी शरद पवार गटाचे म्हणणे आयोगाने ऐकून घेत या प्रकरणाची पुढील सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्याचा आदेश दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हे नाव आणि घड्याळ या निवडणूक चिन्हाच्या मुद्यावर निवडणूक आयोगापुढे ही सुनावणी झाली. जवळपास दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार गटाचे वकील मनू अभिषेक सिंघवी यांनी गंभीर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करण्यासाठी अजित पवार गटाने आयोगापुढे २० हजार खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. यातील ८९०० प्रतिज्ञापत्रांची यादी तयार करून ती निवडणूक आयोगाला सोपविण्यात आली आहे. आयोगाला आपले म्हणणे मान्य केले असल्याचेही सिंघवी म्हणाले.
(हेही वाचा PM Narendra Modi : काँग्रेसला १०० वर्षे सत्तेपासून दूर ठेवा, अन्यथा…; पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?)
खोट्या प्रतिज्ञापत्रांची विभागणी जवळपास २४ कॅटेगिरीमध्ये करण्यात आली आहे. त्यात मृत्यू झालेले व्यक्ती, राकाँतील असे पदे ज्यांचे अस्तित्वच नाही, हाउसवाईफ आणि झोमॅटोचे सेल्स मॅनेजर आदीचा समावेश आहे. खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले म्हणून अजित पवार गटावर भारतीय दंड संहिताअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी सिंघवी यांनी केली. या सुनावणीसाठी स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. तर अजित पवार गटाकडून खासदार सुनिल तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community