१९ मे रोजी संदीप देशपांडेंना अटक होणार?

99

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी १७ मे रोजी पूर्ण झाली असून १९ मे रोजी मुंबई सत्र न्यायालय अटकपूर्व जामीनावर निकाल देणार आहे. त्यामुळे देशपांडे आणि धुरी यांच्यावरील अटकेची तलवार कायम राहिली आहे.

मुंबई सत्र न्यायालय अटकपूर्व जामीनावर निकाल देणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्यावर या दरम्यान झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाल्या होत्या यानंतर या मनसे नेत्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतल्यावर त्यांच्या अटकपूर्व जामीनावर मुंबई सत्र न्यायालयात १७ मे रोजी सुनावणी करण्यात आली.

( हेही वाचा : राज्यव्यापी आंदोलनाला जे.जे.रुग्णालयातील परिचारिकांचा पाठिंबा )

मनसे नेते संदीप देशपांडेंच्या बाजूने वकील सुजित जगताप यांनी युक्तिवाद केला. देशपांडेंच्या जामीन अर्जाला राज्य सरकारकडून कडाडून विरोध करण्यात आला. जामीन दिल्यास पोलीस तपासावर परिणाम होऊ शकतो. ज्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे ते दोघेही राजकीय नेते आहेत असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. १० मे रोजी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आज सुनावणी झाल्यावर या प्रकरणी १९ मे रोजी न्यायालय निकाल देणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.