माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका आणि अंतरिम जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. उच्च न्यायालयाचे कार्यवाह न्यायाधीश आणि न्यायमूर्ती नवनीत कुमार यांच्या खंडपीठाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी निकाल राखून ठेवला होता. (Hemant Soren)
दरम्यान सोरेन यांनाही न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांना ६मे रोजी काकांच्या श्राद्ध कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र सोरेन यांना मीडियापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. हेमंत सोरेन यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, ईडी ज्या जमिनीबाबत बोलत आहे ती जमीन त्यांच्या नावावर कधीच नव्हती. निकाल देण्यास उशीर झाल्यामुळे हेमंत सोरेन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली असून, त्यावर ६ मे रोजी सुनावणी होणार आहे. (Hemant Soren)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नऊ खासदारांची तिकीटे कापली! पण का? काय होती त्या मागची कारणे? वाचा )
यापूर्वी २७ एप्रिल रोजी रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. हेमंत सोरेन यांचे काका राम सोरेन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. सोरेनने आपल्या काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयात १३ दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता, मात्र सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. माजी मुख्यमंत्री सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community