कोरोना काळात खासगी रुग्णालयांना शासनाने उपचारांचे रक्कम निश्चित करून दिले असताना, या कालावधीत खाजगी रुग्णालयांनी भरमसाठ बिले आकारून रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांची लूट केली आहे. हे स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मान्य केले.
आरोग्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती
कोरोनाच्या कालावधीत खाजगी रुग्णालयांविषयी राज्यातून एकूण ६३ हजार ३९८ तक्रारी आल्या आहेत. त्यांतील ५६ हजार ९९४ तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे ३५ कोटी १८ लाख ३९ हजार ६१ रुपये परत करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २३ डिसेंबरला विधान परिषदेत दिली आहे.
( हेही वाचा : वेळप्रसंगी सीमापार जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करू – राजनाथ सिंह )
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नाकारला
भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत शासनाकडून निधी देण्यात आला असूनही खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून पैसे घेतले. याविषयी माहिती देतांना राजेश टोपे यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नाकारल्याविषयी २ हजार ८१ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांतील ७७४ तक्रारींचे निवारण करण्यात आले. त्यातून रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईकांना १ कोटी २० लाख ६६ हजार १६८ रुपये परत करण्यात आले.
Join Our WhatsApp Community