ठाण्यात सर्वाधिक परप्रांतीयांची संख्या; Raj Thackeray यांचा घणाघात

मुंबईत १ महापालिका आहे, पुण्यात २ महापालिका आहे, ठाण्यात सात ते आठ महापालिका आहेत. इकडच्या लोकांनी ही लोकसंख्या वाढवली आहे का?, असे राज ठाकरे म्हणाले.

259

आज इथे ठाणे आणि कल्याण लोकसभेची संयुक्त सभा आहे. मी अनेक वर्षे सांगतोय, आज या देशातील विविध राज्यांतून लोक या जिल्ह्यात येत आहेत, तुम्ही कितीही रस्ते आणि पूल बांधा पण जोवर हे बाहेरचे लोंढे थांबणार नाही तोवर काही होणार नाही. जगात ठाणे जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.

ठाण्यात सहा ते सात महापालिका का झाल्या? 

लोकसभा निवडणुकीतील कल्याण लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते. ठाणे हे टुमदार शहर होते. तलावांचे शहर म्हणायचे. पण हे तलाव बुजवले आणि टँकर सुरु झाले. महापालिका केव्हा होतात, आधी तिथे ग्रामपंचायत असते, मग जिल्हा परिषद होते, पुढे नगर पालिका मग महापालिका होते. हे लोकसंख्या वाढती तसे ठरते. मुंबईत १ महापालिका आहे, पुण्यात २ महापालिका आहे, ठाण्यात सात ते आठ महापालिका आहेत. इकडच्या लोकांनी ही लोकसंख्या वाढवली आहे का? श्रीकांत शिंदे, नरेश मस्के तुम्ही लोकसभेत हे मुद्दे मांडा. आमच्यावरील बोजा आवरा. ही १८वी लोकसभा आपण लढवतो कशासाठी? ही शहरे आणि राज्य यांचा विकास झाला पाहिजे, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या बाईला तुम्ही पक्षाचे प्रवक्ते केले; Raj Thackeray यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल)

आनंद मठात आल्यावर जुने दिवस आठवले

बऱ्याच वर्षांनी ठाण्यातील आनंद मठात गेलो, तेव्हा सगळे जुने दिवस आठवायला लागले. माझे आणि आनंद दिघे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मी जेव्हा आनंद मठात जायचो, तेव्हा त्यांना स्वच्छता ठेवायला सांगायचो. कारण कुठे कुंकू पडलेले, उदी पडलेले आणि त्यातच ते झोपायचे. पण तरीही त्यांच्यासोबत ठाणे फिरताना मजा यायची. तेव्हा सभा व्हायच्या, त्यांची व्यासपीठेही छोटी असायची, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.