हिजाब प्रकरणाचे दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रात उमटले पडसाद 

124

कर्नाटकातील शाळा-महाविद्यालयांमधील हिजाब प्रकरणी राजकारण आणि समाजकारण ढवळून निघत आहे, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहे.  बुधवारी चंद्रपूरमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या मोहिमा राबवण्यात आल्या, गुरुवारी पुण्यात हिजाबच्या समर्थनार्थ, तसेच विरोधातही मोर्चे काढण्यात आले.

राष्ट्रवादीचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुस्लिम महिला हिजाब घालून या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. भारतीय संविधानाने प्रत्येकाला कोणतं पेहराव करायचा याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांचा हिजाब घालणे हा त्यांचा अधिकार आहे, असे रुपाली पाटील म्हणाल्या.

(हेही वाचा प्रियंका गांधी झाल्या ट्रोल! #Bikini का सुरु झाला ट्विटर ट्रेंड)

हिंदू महासंघाचा हिजाबला विरोध 

तर पुण्यातच दुसरीकडे हिजाबला विरोध करण्याच्या हेतूने हिंदू महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि शाळकरी मुले भगव्या रंगाचे कपडे घालून या मोर्च्यात सहभागी झाले होते. शेकडो वर्षांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकला होता आणि तो मराठा सम्राज्याचा आपल्या शिवाजी महाराजांचा होता. अवघा हिंदुस्थान मराठ्यांच्या हातात होता, त्या पुढील काही वर्ष हिंदूंसाठी खरं तर हा दीपोत्सवच होता, असे सांगत हिंदू महासंघाने शिवछत्रपती आणि पेशव्याच्या वेशात शाळकरी मुलांना सहभागी करून  हिजाबचा विरोध केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.