Congress : काँग्रेसने आणला घरातील ‘शौचालय कर’; स्वच्छतागृह वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे

140
Congress : काँग्रेसने आणला घरातील 'शौचालय कर'; स्वच्छतागृह वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे
Congress : काँग्रेसने आणला घरातील 'शौचालय कर'; स्वच्छतागृह वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे

हिमाचल प्रदेशात सत्तेत असलेल्या काँग्रेस (Congress) सरकारने घरातील शौचालयांवर कर लादणार असल्याची घोषणा केली. मुळात राज्य आर्थिक संकटात सापडलेले असल्याने राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी सुखविंद्र सिंह सुक्खू सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

( हेही वाचा : Devendra Fadnavis म्हणतात,…पुन्हा येणार!

हिमाचल प्रदेश राज्य सरकार आता शहरी भागातील प्रत्येक घरातील शौचालयावर कर वसूल करणार आहे. त्याचे दरही जाहीर करण्यात आले आहेत. हिमाचलमध्ये घरांमध्ये बसवलेल्या प्रत्येक शौचालयावर दर महिना २५ रुपये कर आकारण्यात येणार आहे. म्हणजे एका घरात जितके शौचालय तितके अधिक कर वसूल करता येईल. तसेच ग्रामीण भागातील मोफत पाणीपुरवठा ही बंद झाला आहे. ज्यामुळे ग्रामीण भागात पाणी घेणाऱ्यांना प्रति महिना १०० रुपये मोजावे लागणार आहेत. (Congress)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.