हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचे वाजले बिगुल, ‘या’ दिवशी होणार निवडणूक…

129
देशाला आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्याआधी २०२३ मध्येच ९ राज्यांच्या विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्याची सुरुवात हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीपासून होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी, १४ ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. येत्या शनिवार, १२ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम? 

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून दिल्लीत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप सत्ता टिकवणार की विरोधक गड उलथवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिमाचलसोबतच गुजरात विधानसभा निवडणुकांच्याही तारखा जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र केवळ एकाच राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. हिमाचलमध्ये एकूण 55.07 लाख मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावतील. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणुका कोविड प्रोटोकॉल पाळून पार पडतील, असे आयुक्तांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान सीमा सील केल्या जातील. फेक न्यूज आणि अफवांवर लक्ष देऊ नका, असे आवाहन आयुक्तांनी केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.