Himanta Biswa Sarma : सगळ्या गांधी परिवाराने मला बिस्कीट खायला देण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही

342

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते गाडीच्या छतावर कुत्र्याला बिस्किटे देताना दिसत आहेत, पण कुत्रा ते खात नाही यानंतर ते बिस्कीट जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला देतात. यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “फक्त राहुल गांधीच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मला हे बिस्किट खायला देण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही.”

हा व्हायरल व्हिडिओ पल्लवी नावाच्या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे त्याच ट्विटला उत्तर देताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिले, “पल्लवी जी, फक्त राहुल गांधीच नाही तर संपूर्ण कुटुंब मला ते बिस्किट खाऊ घालू शकले नाही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी बिस्कीट खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही राहुल गांधींचा हा व्हायरल व्हिडिओ X वर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, ‘काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यांशी केली होती आणि इथे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात एका कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत आहेत आणि कुत्र्याने खाल्ली नाही तेव्हा त्यांनी तीच बिस्किटे त्यांच्या कार्यकर्त्याला दिली..’ त्यांनी पुढे लिहिले की, ‘एखाद्या पक्षाचा अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांना कुत्र्यासारखे वागवत असतील, तर अशा पक्षाचे अस्तित्व नाहीसे होणे स्वाभाविक आहे.’

(हेही वाचा Uniform Civil Code : उत्तराखंडातील कायद्यामुळे धर्मांतर, लव्ह जिहाद, हलालवर प्रतिबंध येणार)

किरेन रिजिजू यांच्यावरही निशाणा साधला

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. अमित मालवीय यांनी शेअर केलेला व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “मी कोणाला दोष द्यायचा? विशेषाधिकारप्राप्त कुटुंबाची मानसिकता की ते लोक जे स्वत:चा अपमान सहन करूनही आपल्या राजपुत्रापुढे झुकत राहतात?”

हिमंता बिस्वा सरमा यांनीही राहुल गांधींवर आरोप केले होते

आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma)  यांनी जुलै 2014 मध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये असताना आसामच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते राहुल गांधींना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटायला गेले होते, तेव्हा राहुल त्यांच्या कुत्र्याला खाऊ घालत होते आणि त्यांना खायला बिस्किटेही दिली होती, असा आरोप त्यांनी केला होता. याच कारणामुळे त्यांनी पक्ष सोडला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.