Himanta Biswa Sarma: घर, शौचालय, रस्ते, सरकारी नोकऱ्या, रेशन मोदींकडून मिळवलं, पण मतदान…; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

सरमा पुढे म्हणाले, आसाममधील हा एकमेव समाज आहे, जो सांप्रदायिकतेत अडकलेला आहे.

156
Himanta Biswa Sarma: घर, शौचालय, रस्ते, सरकारी नोकऱ्या, रेशन मोदींकडून मिळवलं, पण मतदान...; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांचे मत व्यक्त केलं आहे. बांगलादेशी वंशाच्या अल्पसंख्याक समुदायावर हल्ला चढवताना सरमा म्हणाले, या समाजातील लोकांना घर, शौचालय, रस्ते, सरकारी नोकऱ्या, रेशन आणि दरमहा १,२५० रुपये मोदी सरकारकडून मिळाले, मात्र, त्यांनी मतदान काँग्रेसला केलं; कारण त्यांना तुष्टीकरण हवे आहे. एवढेच नाही तर, त्यांचा उद्देश विकास नव्हे, तर मोदींना हटवून आपल्या समाजाचा दबदबा कायम ठेवायचा होता, असे सरमा म्हणाले, ते शनिवारी, (२२ जून) गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

सरमा पुढे म्हणाले, आसाममधील (Assam) हा एकमेव समाज आहे, जो सांप्रदायिकतेत अडकलेला आहे. यावरून सिद्ध होते की, हिंदू समाज सांप्रदायिकतेत अडकलेला नाही. आसाममध्ये सांप्रदायिकतेत कुणी अडकलेले असेल, तर तो केवळ एकच समाज आहे.

(हेही वाचा – International Space Station: अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परतण्यास विलंब, कारण काय?)

आसाममध्ये NDAला ११ जागा
आसाममध्ये NDAने १४ पैकी ११ जागा जिंकल्या, तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना केवळ ३ जागाच मिळाल्या. यावर बोलताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले, काँग्रेसच्या ३९ टक्के मतांचे विश्लेषण केल्यास, हे संपूर्ण राज्यातून मिळालेले नाही. यातील ५० टक्के मते ही अल्पसंख्यक बहुल अशा २१ विधानसभा मतदारसंघातून मिळाली आहेत, या भागांत भाजपाला केवळ ३ टक्के मते मिळाली आहेत.

काँग्रेसवर जोरदार निशाणा
आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. रॉबर्ट वाड्रा यांच्या राजकारणातील एन्ट्रीसंदर्भात प्रश्न केला असता सरमा म्हणाले होते, ३ गांधी, तर आधीच लॉन्च झालेले आहेत. रॉबर्ट वड्रा आणि त्यांच्या मुलांनीही लवकरच राजकारणात यावे, अशी माझी इच्छा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.