अरबमध्ये ‘वक्फ’ची संकल्पना जन्माला आली नव्हती, त्या लाखो वर्षांपूर्वीपासून गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्याचे (Mahakumbh) आयोजन होत आले आहे. जिथे कुंभ भरतो, ती गंगा मातेची भूमी आहे. ती नैसर्गिक भूमी वक्फची कशी काय होऊ शकते? मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी कुंभमेळा स्थळावरील 54 बीघा भूमीवर वक्फचा दावा केला आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र विरोध करते. हा दावा केवळ निराधार नसून कुंभमेळ्याच्या (Mahakumbh) पवित्र वातावरणाला गालबोट लावण्याचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा सुनियोजित प्रयत्न आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि समितीचे कुंभ अभियान समन्वयक आनंद जाखोटिया उपस्थित होते.
(हेही वाचा चीनमध्ये Metapneumovirus चे थैमान; नव्या वर्षात कोविड-१९च्या आठवणींनी भीतीचे वातावरण)
सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले की, कुंभमेळ्याच्या (Mahakumbh) पवित्रतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही राज्य सरकारला आवाहन करतो की, त्यांनी कठोर पावले उचलावीत आणि सनातनी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवणाऱ्या मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी. वक्फ सुधार अधिनियमासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीसमोर हिंदूंची भूमिका मांडणारे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले की, मौलाना शहाबुद्दीन रजवी यांच्या मते वक्फच्या भूमीवर कुंभमेळा (Mahakumbh) आयोजित करणे हा मुस्लिम समाजाचा मोठेपणा आहे, असे असेल तर आम्हाला त्यांना विचारायचे आहे की, रामजन्मभूमीवर बाबरने केलेल्या अतिक्रमणाच्या वेळी मुस्लिम समाजाने ही उदारता का दाखवली नाही? आजही काशी, मथुरा, संभळ आणि अशा 15,000 मंदिरांवर इस्लामिक अतिक्रमण आहे. त्याबाबतीत त्यांनी उदारता का दाखवली नाही? कुंभ क्षेत्राला (Mahakumbh) वक्फची भूमी मानणाऱ्यांना कुंभ क्षेत्रात प्रवेश नाकारण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
Join Our WhatsApp Community