तर 2040 मध्ये भारताचा पंतप्रधान मुसलमान असेल! रणजित सावरकरांनी दिला धोक्याचा इशारा

187

स्वातंत्र्य काळात भारतात मुसलमानांची लोकसंख्या २७ टक्के होती, त्यावेळी देशाची फाळणी करून मुसलमानांनी पाकिस्तानची निर्मिती केली. त्यानंतर भारतात मुसलमानांची लोकसंख्या कमी होती, परंतु आज पुन्हा मुसलमानांची लोकसंख्या २२ टक्के इतकी बनली आहे आणि देशात पुन्हा फाळणी सदृश्यस्थिती बनली आहे. हिंदू जर आज सावध बनले नाही आणि संघटित झाले नाही, तर २०४० मध्ये भारताचा पंतप्रधान मुसलमान बनेल, असा धोक्याचा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दिला.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथे १२ आणि १३ मार्च या दिवशी २ दिवसीय प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. कोरोनाच्या २ वर्षांच्या कालावधीनंतर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रथमच घेण्यात आले. या अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी रणजित सावरकर, डॉ. विजय जंगम आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस व्यासपिठावर उपस्थित होते. आपल्याला रामराज्य आणायचे आहे, पण ते श्रीकृष्णाच्या मार्गाने आणायचे आहे, जशास तसे उत्तर देवून आपल्याला हे हिंदू राष्ट़ स्थापन करण्याचे लक्ष्य साध्य करायचे आहे. त्याकरता भगवान श्रीकृष्णाची नीती अवलंबवावी लागणार आहे. राष्ट्र हे सर्वप्रथम असायला पाहिजे, त्यासाठी मग काही पाप-पुण्य काही नसते, सगळे श्रीकृष्णामध्ये समर्पित होत असते, असेही रणजित सावरकर म्हणाले.

(हेही वाचा भिवंडी पीव्हीआर थिएटरची होणार चौकशी! विधानसभा अध्यक्षांनी काय दिला आदेश?)

हिंदू शेकडो जातीत विभागले म्हणून कवकुवत

1921मध्ये वीर सावरकर भारतात परतले, तेव्हा त्यांना रत्नागिरीत कोठडीत ठेवले होते. त्यावेळी मोहनदास करमचंद गांधी यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली, त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड घडले आणि लागलीच त्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यावेळी गांधींनी हत्याकांडाचा एका अक्षराने निषेध केला नाही, उलट त्याआधी एका ब्रिटिश अधिका-याची हत्या करण्यात आली होती, त्यांची निंदा केली, तेव्हा गांधीनी क्रांतीकारकांचा निषेध केला होता. त्यानंतर खिलाफत चळवळ सुरू झाली, त्यामध्ये तुर्कस्थान येथील बादशहाचा खलिफाचा दर्जा काढून घेण्यात आला होता. त्याला कोणत्याही मुस्लिम राष्ट्राने विरोध केला नव्हता, पण भारतातील मुसलमानांनी खलिफाला पुनर्स्थापन करण्यासाठी आंदोलन केले. त्याला गांधींनी पाठिंबा दिला. काँग्रेसला न सांगता त्यांनी या चळवळीचे अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यावेळी अली बंधू म्हणत की, आम्ही गांधींना पाठिंबा देत नाही, तर गांधी आम्हाला पाठिंबा देत आहेत. या चळवळीशी हिंदूंचा काहीही संबंध नसतानाही मोठ्या प्रमाणात देशात दंगली झाल्या. त्यात हिंदूंचा शिरच्छेद केला गेला. महिलांवर अत्याचार केले. तरीही गांधी म्हणाले, माय ब्रेव मोपला ब्रदर! ही सद्गुण विकृती आहे. चला जावू द्या, सोडून द्या, असे म्हणण्याच्या या प्रवृत्तीमुळेच हिंदूंचे नुकसान झाले. तेव्हा वीर सावरकर यांनी मुस्लिम कमी संख्येने असतानाही हिंदू मार का खात आहे? याचा विचार केला. तेव्हा त्यांना उमगले की, हिंदू हे शेकडो जातींमध्ये विभागले आहेत. त्यांच्यात संघटन नाही. यात वीर सावरकर हिंदूंना दोष देत आहेत. हिंदू स्वत:ला लुटू का देतात? त्यामुळे वीर सावरकर यांनी हिंदू शब्दाची व्याख्या केली, जो या देशाच्या पुण्य भूमीत राहतो तो हिंदू, असेही रणजित सावरकर म्हणाले.

(हेही वाचा देश ८०० वर्षांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलाय, स्वातंत्र्य टिकवण्याचा निर्धार करा! रणजित सावरकर यांचे आवाहन)

हिंदूंनी संघटित होण्याची गरज

फाळणी झाली तेव्हा लाखो लोक मारले गेले, त्यावेळी मुसलमानांची २७ टक्के लोकसंख्या होती, आज मुसलमानांची लोकसंख्या पुन्हा २२ टक्के झाली आहे आणि पुन्हा ते संघटित झाले आहेत. याचा प्रत्यय उत्तर प्रदेश निवडणुकीत आला आहे. या ठिकाणी 71 मुसलमान बहुल मतदारसंघात 67 मतदारसंघ एक गठ्ठा मतांच्या जोरावर समाजवादी पक्षाने जिंकले. हे असेच सुरू राहिले आणि हिंदू असंघटित राहिले, तर 2040 मध्ये देशाचा पंतप्रधान मुसलमान असेल, असा धोक्याचा इशारा रणजित सावरकर यांनी दिला. ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा’, अशी भूमिका हिंदूंनी घेतली पाहिजे. इतिहासाची पुनरावृत्ती होणारच आहे, वीर सावरकर यांचा आग्रह असायचा की, इतिहासातून शिका. आज नसरुद्दीन शहा म्हणतात की, 20 टक्के मुसलमान हिंदूंना भारी पडतील. नसरुद्दीन शहा असो की ओवेसी असो या सगळ्यांची भाषा महमंद अली यांची आहे. काश्मीरमध्ये 5 लाख हिंदूंचा शिरच्छेद करण्यात आला. हिंदूंनी सावध बनले पाहिजे. श्रीकृष्णाने शस्त्र उचलले नव्हते, युद्ध पांडवांनाच लढावे लागले. आता युद्ध सुरू झाले आहे, मुसलमानांनी जागोजागी मिनी पाकिस्तान स्थापन केला आहे, ते गावेच्या गावे घेत आहेत, तेथून हिंदूंना पळवून लावत आहे. रस्त्यावरील सगळे व्यवसाय हे मुसलमान करत आहेत. त्यामुळे 5 मिनिटांत ते शंभर-दीडशे जमा होतात. आता लढाई सुरू झाली आहे, त्यामुळे आता मतभेद दूर करून संघटित होण्याची गरज आहे. मोदी 2024 ची निवडणूक हरले, तर परिस्थिती वाईट होईल, मी म्हणत नाही भाजप सगळेच चांगेल काम करत आहे, पण हिंदूंनो, तुमची इतकी ताकद वाढवा की, आम्ही कोणत्या पक्षाची तळी उचलणार नाही, तर राजकीय पक्षांना आमच्या मागे यावे लागेल, अशी धारणा बनली पाहिजे, असेही रणजित सावरकर म्हणाले.

 ‘हिंदु राष्ट्र’ हे राष्ट्रीय आंदोलन झाले पाहिजे ! – चेतन राजहंस

विश्वयुद्धाला प्रारंभ झाला आहे. येणार्‍या काळात भारतातही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करायला हवी. भविष्यात आपणाला रस्त्यावर उतरून हिंदू बांधवांचे रक्षण करावे लागेल. अशा वेळी धर्मनिष्ठ, राष्ट्रभक्त आणि सज्जन हिंदूंचे रक्षण करणे, हे आपले प्राधान्य असेल. हे कार्य आपणाला संघटितपणे करायचे आहे. आपत्काळात व्यक्तीनिष्ठ किंवा पक्षनिष्ठ न रहाता आपण धर्माच्या बाजूने असणार्‍यांच्या समवेत रहायला हवे. हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी आपण एकत्र यायला हवे. हिंदु राष्ट्र हे ‘राष्ट्रीय आंदोलन’ झाले पाहिजे. ‘श्रीकृष्णाचे सेवक आहोत’, असा भाव ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करायला हवे, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.