- नित्यानंद भिसे
हिंदुत्वनिष्ठ नेते अतिरेकी संघटनांच्या रडारवर असणे ही आता नवी गोष्ट राहिली नाही. या देशाला मुस्लिम राष्ट्र बनवण्याची मनीषा आयएसआयएस (ISIS) ची आहे हे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. भारतात प्रतिबंध आणलेल्या पीएफआय या संघटनेने तर २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा कट रचल्याचे कागदोपत्री पुराव्याने उघड झाले आहे. त्यासाठी यामध्ये अडथळा असलेल्या हिंदुत्ववादी संघटना या दहशतवादी संघटनांचे लक्ष्य राहिल्या आहेत. या संघटना संपवण्यासाठी त्यांचे नेते ठार करण्याचे कारस्थान या संघटना रचत असतात.
या संघटनांचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी संघटना आयएसआयएस करते, हेही आता लपून राहिले नाही. म्हणून खलिस्तानी संघटनेला मदत करून आयएसआयएस (ISIS) परदेशातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. आता ही संघटना भारतात स्लीपर सेल निर्माण करून भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना ठार करण्याचे कारस्थान रचत आहे. पुणे मॉड्युल हे त्याचे उदाहरण आहे. याचा खुलासा नुकतेच उत्तर प्रदेश एटीएसने अटक केलेल्या आयएसआयएस या संघटनेच्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून झाला आहे.
आयएसआयएस (ISIS) देशातील अनेक शहरांवर रासायनिक बॉम्बने हल्ला करण्याची योजना आखत होती. हा कट आयएसआयएसच्या पुणे मॉड्युलशी संबंधित होता. आयएसआयएसच्या योजनेनुसार, बॉम्ब हल्ल्यात हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असे अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून समोर आले आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार, अटक केलेल्या दहशतवाद्यांनी कबूल केले आहे की, गाझियाबादचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती आणि इतर हिंदुत्ववादी नेते आयएसआयएसचे लक्ष्य होते आणि त्यांना ठार मारण्यासाठी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट आखला जात होता. यति नरसिंहानंद सरस्वती हे गाझियाबादमधील शिव शक्ती धाम मंदिराचे मठाधीश आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महंत अजूनही चर्चेत आहेत. त्यांनी मुस्लिमविरोधी घोषणाबाजीही केली.
अटक करण्यात आलेला दहशतवादी पेट्रोकेमिकल अभियंता अब्दुल्ला अर्सलान याने सांगितले की, बॉम्बस्फोट करून महंत यति नरसिंहानंद यांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. बिन तारिकसह अर्सलान आणि वजीउद्दीन या दहशतवाद्यांनी महंतांच्या शिवशक्ती धाम मंदिराची रेकी देखील केली होती. या धक्कादायक माहितीनंतर आयएसआयएस (ISIS) च्या इतर दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी एटीएस अटक केलेल्या दहशतवाद्यांची चौकशी करत आहे. त्यांच्या उद्दिष्टांचीही चौकशी केली जात आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी हेदेखील आयएसआयएसशी संबंधित असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. वजीदुद्दीनला उत्तर प्रदेश एटीएसने छत्तीसगडमधील दुर्ग येथून अटक केली. हे सर्व स्लीपिंग मॉड्यूलचा भाग आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाव्यतिरिक्त हे प्रकरण दिल्लीच्या जामिया विद्यापीठाशीही जोडले जात आहे. या मॉड्यूलने अनेक राज्यांमध्ये आपले जाळे तयार केले आहे.
या सर्व माहितीवरून भारतात आयएसआयएसने किती खोलवर पाळेमुळे रोवली आहेत, याचा प्रत्यय येतो. त्यामुळे सगळे मुसलमान दहशतवादी नसतात, असे म्हणणाऱ्या पुरोगाम्यांना सगळेच दहशतवादी मुसलमान कसे आहेत, असा प्रश्न विचारणे अजिबात गैर नाही.
Join Our WhatsApp Community