राहुल गांधींच्या वक्तव्याचा हिंदू महासभेकडून निषेध, टिळक भवनावर काढणार मोर्चा

86

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बालिशबुद्धीने आरोप केले आहेत. त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस भवन अर्थात टिळक भवनावर हिंदू महासभेचे कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत. प्रदेश काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतरच आम्ही आमची भूमिका जाहीर करु, असा इशारा अखिल भारतीय हिंदूमहासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले यांनी दिला. वीर सावरकर हे भारताच्या क्रांतिकारांचे मुकुटमणी असून, त्यांच्याविरोधातील वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शनिवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हिंदूमहासभेने स्वातंत्र्यवीर सावकरांविरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचा कडाडून विरोध केला. आजच्या स्वतंत्र भारताच्या लढ्यात वीर सावकरांचे बहुमूल्य योगदान आहे. भारताला हिंदुत्वाची देणगी वीर सावकरांनी दिली. हिंदूमहासभा तत्वाशी होणारी तडजोड सहन करणार नाही, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीवरही टिका केली. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केवळ राहुल गांधी यांच्या विचारांशी आपण असहमती दर्शवली. त्यांनी निर्णायक भूमिका घ्यायला हवी. अंदमान विमानतळावर वीर सावरकरांचे घोषवाक्ये काढल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जोडो मारो आंदोलन केले. त्यांचा मुलगा आणि नातवाकडून मात्र काँग्रेसबाबत भलतीच भूमिका घेतली जात आहे. बाळासाहेबांचा नातू राहुल गांधी यांच्यासोबत फिरला. हे दुर्देवी असल्याची टीका भोगले यांनी केली.

(हेही वाचा हिंगोलीतही ‘आफताब’; हिंदू तरुणीला धर्मांतर करण्यासाठी केले अत्याचार)

राहुल गांधींनी शरद पवारांच्या बालवाडीतून घ्यावे शिक्षण

केवळ एका कागदाच्या तुकड्यावरुन सावरकरांच्या स्वातंत्रलढ्याचा अपमान करु नका. सावरकरांच्या देशभक्तीवर शंकेला वाव नाही. राहुल गांधी यांचे वक्तव्य बालिशबुद्धीतून वक्तव्ये देतात. शरद पवारांच्या बालवाडी शाळेतून त्यांनी राजकारण शिकायला हवी, या भाषेत हिंदुसभेचे अध्यक्ष अनुप केणी यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.