आज आपल्या सर्वांच्या हातात असलेला मोबाईल हे आपले दुहेरी शस्त्र आहे. ते कसे वापरायचे हे आपण शिकून घेतले पाहिजे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर त्यांनी हेच सांगितले असते. हिंदु राष्ट्र आपली पुढची पिढी आणू शकेल, त्यामुळे तिला तिच्या भाषेत समजेल अशी सामुग्री आपण निर्माण केली पाहिजे. ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार घेऊन काम करणारे ३० सेकंदाचे ‘रील्स’ बनवावे लागतील. माध्यमांना अशी तयार केलेली बातमी द्यायला हवी, त्यासाठी आजच्या डिजिटल वॉरमध्ये आपण ‘डिजिटल वॉरियर’ अर्थात ‘डिजिटल योद्धा’ बनले पाहिजे, असे आवाहन ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह कार्यवाह स्वप्नील सावरकर (Swapnil Savarkar) यांनी केले.
हिंदुत्वनिष्ठ विचारांची माध्यमे शक्तीशाली बनवावीत
वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनात २७ जून या दिवशीच्या ‘राष्ट्र, धर्म, संस्कृती रक्षा के प्रयास कैसे करे ?’ या द्वितीय सत्रात ‘हिंदु संस्थाओंको प्रभावी मीडिया व्यवस्थापन की आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते. वर्तमानपत्रात जागेची मर्यादा असते, इलेकट्रॉनिक मीडियामध्ये सेकंदाचा हिशेब असतो. ‘क्रिकेट’, ‘क्राईम’ (गुन्हे) आणि ‘कॉन्ट्रोव्हर्सी’ (वाद) माध्यमातील ३ ‘सी’ आहेत. आज कुणालाही यु-ट्युब कसे चालते, हे शिकवले जात नाही. हिंदुत्वनिष्ठ पाठ्यक्रम असलेले पत्रकारितेचे शिक्षण दिले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ शिक्षण देणार्या संस्था काढायला हव्यात. १०-१५ वर्षे आपण आपल्या राष्ट्रासाठी माध्यमांवर मेहनत घेतली, तर पुढे आपल्याला हवी तशी माध्यमे होतील. आज हिंदू त्यांच्या परिसरात वाघ आहेत; परंतु हे सर्व वाघ एकत्र आले पाहिजेत. आज साम्यवादी माध्यमे बदलण्यासाठी सत्तेत असणार्यांनी दबाव टाकला पाहिजे आणि तसा तो दबाव टाकला जाण्यासाठी आपण आपली माध्यमे शक्तीशाली बनवली पाहिजेत, असे स्वप्नील सावरकर (Swapnil Savarkar) म्हणाले.
माध्यमांना ‘मॅनेज’ करा
आज ‘डिजिटल’ युग आहे. आपण या ‘डिजिटल’ युगाच्या नव्या क्रांतीत सहभागी होण्यासाठी सिद्ध आहोत का? आज इथे एवढा मोठा कार्यक्रम होत असून त्याला मुख्य प्रवाहातील माध्यमे प्रसिद्धी का देत नाहीत? प्रसारमाध्यमांना कसे ‘मॅनेज’ केले जाते, हे लक्षात घेतले पाहिजे. आज १० टक्के हिंदुत्वनिष्ठ पत्रकार असतील, पण हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत का? हे पाहायला पाहिजे. त्या पत्रकारांना मोठे केले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व भारतात माध्यमे ध्येयवादी होते, आता त्यांचा धंदा बनला आहे. तुमचा कंटेन्ट मीडियासाठी उपयुक्त असला पाहिजे. तरच तुमच्या बातमीला प्रसिद्धी मिळणार आहे, असे स्वप्नील सावरकर (Swapnil Savarkar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community