महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) गुन्हा दाखल असलेला व हिंदू राष्ट्र संघटनेचे संबंधित तुषार हंबीर याच्यावर सोमवारी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात चौघांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवित हल्ला रोखला, या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
(हेही वाचा – कल्याणजवळ रेल्वे रूळाला तडा, मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं)
पुण्यातील ससूनमध्ये ही घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील बंड गार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारानंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्कानुसार गुन्हा दाखल असून तो येरवडा कारागृहात आहे. आजारी असल्यामुळे त्याच्यावर 25 ऑगस्टपासून ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हंबीर याच्यावर उपचार सुरु असलेल्या ठिकाणी आले, त्यांनी हंबीरला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी प्रसंगावधान दाखवत हल्लेखोराने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community