Hindu : हिंदू मतदारराजा जागा राहा, हे धर्मयुद्ध संपणारं नाही..!

१९४७ मध्ये 'हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्थान' हा त्यांचा नारा होता. आता 'हसके ही लिया हिंदुस्थान' अशी गत व्हायला नको असेल तर मतदार राजा कायमच जागा रहा. पुन्हा झोपी गेलास तर तुझ्या पुढच्या पिढ्याही कायमच्या झोपी जातील हे विसरू नकोस!

320
  • मंजिरी मराठे

महाराष्ट्रातील २०२४ ची विधानसभा निवडणूक लढली गेली ती धर्मयुद्ध म्हणूनच. त्यात महायुतीला अनपेक्षित यश मिळालं.
‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ हे नारे अचूक ठरले. हिंदू (Hindu) मतदार चक्क भटकायला न जाता, घरी न बसता मतदानाला गेला आणि त्यामुळेच हे शक्य झालं.

हिंदू हा सतत निद्रिस्त असतो. जेव्हा अगदीच गळ्याशी येतं तेव्हा तो जागा होतो. सध्या देशातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. हिंदू मुस्लीम यांच्यातील तेढ कमालीची वाढली आहे. मुस्लीम प्रचंड आक्रमक झाले आहेत. आमची सत्ता आली तर आम्ही राममंदिर पाडू; मोदी-योगी किती दिवस राहतील नंतर गाठ आमच्याशी आहे; पंधरा मिनिटं पोलीस हटवून पाहा अशा ओवेसी, इम्तियाज जलील यांच्या सारख्यांच्या धमक्या; बुरख्यात राहिलात तरच सुरक्षित रहाल असलं बरळणं, बलात्कार टाळता येत नसेल तर पडून एन्जॉय करा असली विकृत मनोवृत्ती समाज माध्यमातून सतत समोर येत होती. त्यातच सज्जाद नोमानी यांच्या ध्वनिफितीनं, त्यांनी केलेल्या १७ मागण्यांना महाविकास आघाडीनं दिलेल्या संमतीनं आधीच भडकलेल्या आगीत आणखी तेलच ओतलं गेलं आणि झोपी गेलेला हिंदू (Hindu) जागा झाला.

याशिवाय महायुतीला यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला तो उद्धव ठाकरे आणि कॉँग्रेसनं. पप्पू तर काय, भाजपाचा ब्रँड अ‍ॅम्बॅसिडरच आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर, आम्ही केवळ मुस्लीम मतांमुळे जिंकून आलो, जय श्रीराम म्हणणारे हरामखोर आहेत, आपला परम पवित्र भगवा ध्वज हे फडकं आहे असं म्हणणं, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणणाऱ्यांच्या विजयी मिरवणुकीत आपल्या भगव्या ध्वजाला खाली रेटत हिरवे झेंडे फडकणं यामुळे उबाठा शिवसेनेविरुद्धचा रोष प्रचंड वाढत गेला. ज्या बाळासाहेबांनी आजन्म हिंदुत्वाचा पुरस्कार केला; मुस्लिमांना, कॉँग्रेसला विरोध केला त्यांच्यातच मिसळून; त्यांच्या हो ला हो करणारे उद्धव ठाकरे; त्यांचं असंबद्ध बरळणं आणि रोज सकाळचा भोंगा यामुळे ‘उद्धव द ग्रेट’ हिंदूंच्या मनातून उतरतच गेले. उद्धव ठाकरे यांच्यावरच्या प्रेमापेक्षा बाळासाहेबांवरची आत्यंतिक निष्ठा, माझ्या मुलाला सांभाळा अशी त्यांनी केलेली विनंती यामुळे काही शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्या मागे आहेत, शिवाय मुस्लिमांनी मतं दिल्यामुळे या निवडणुकीत उबाठाला काही जागा तरी मिळाल्या. शिवाय त्यांच्या मदतीला मनसे धावून आली.

(हेही वाचा Kash Patel: डीप स्टेट चे विरोधक अशी प्रतिमा असणारे काश पटेल अमेरिकन एफबीआय चे प्रमुख… डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा मास्टर स्ट्रोक)

आत्ता काय गरज होती राज ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची, मुलाला उभं करण्याची? त्यांना आपल्या लेकाला राजकीय रिंगणात उतरवायचं होतं तर त्यांनी त्याची तयारी केव्हाच सुरू करायला हवी होती. अगदी पाच नाही निदान दोन चार वर्ष तरी अमित ठाकरे यांनी काम करायला हवं होतं, लोकांत मिसळायला हवं होतं. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला आणि काहीच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सत्तेत असू असंही जाहीर केलं, ते कोणाच्या जीवावर? आणि तरीही तुम्ही भाषणात भाजपाला नावं ठेवत राहिलात तर याचा मतदारांनी काय अर्थ लावायचा? मनसे केवळ युतीची मतं फोडण्याचं महत्कार्य करणार हे वाटतंच होतं आणि झालंही तसंच. मनसेनं उमेदवार उभे केल्यामुळे शिवसेनेचे (शिंदे) ७ आणि भाजपाचे ३ असे महायुतीचे एकूण १० उमेदवार पडले. नाहीतर उबाठा शिवसेनेला केवळ १० जागा मिळाल्या असत्या. वरळीत आदित्य ठाकरे सुद्धा पडले असते. मनसेच्या चुकीच्या खेळीमुळे पडला तो त्यांचाच मुलगा आणि उबाठा शिवसेनेला २० आकडा तरी गाठता आला. देशासमोरील प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहेत, ते नुसते मांडून काय उपयोग? तुम्ही त्यावर काय उपाययोजना करणार ते लोकांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे आपल्या भाषणाला गर्दी होते ती लोकांना मनोरंजन हवं असतं म्हणून, ठाकरी शैली ऐकायची असते म्हणून, हे राज ठाकरे यांनी समजून घ्यायला हवं, युतीच्या यशाला हे सगळे मुद्दे तर कारणीभूत झालेच पण लोकसभा निवडणुकीत चांगलाच मार खाल्ल्यामुळे भाजपाही ग्लानीतून बाहेर आला, दुरावलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जवळ आला, नुसतं ‘मोदी है तो मुमकिन है’ म्हणून भागणार नाही, मतदारांना भेटावं लागेल, गल्लोगल्ली फिरावं लागेल हे भाजपाला वेळीच उमगलं, संघासह सगळ्या हिंदुत्ववादी (Hindu) संघटनांनी खूप कष्ट घेतले आणि महायुतीला प्रचंड यश मिळालं.

पण या यशामुळे भाजपानं हुरळून जाऊ नये. धारा ३७० हटवणं, डिजिटायझेन, नोटाबंदी, रस्ते बांधणी, सुधारलेले आंतरराष्ट्रीय संबंध, देश विदेशात वाढलेली भारताची ख्याती ही त्यांची चांगलीच कामं आहेत. पण केवळ एक चूक सगळ्या चांगल्या कामावर पाणी फिरवते. ही जशी हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई आहे तशीच भाजपाच्याही अस्तित्वाची लढाई आहे. अजित पवारांना बरोबर घेणं हा भाजपाचा निर्णय अनेकांना पटला नव्हता. (पण एक ‘मोठ्ठा गडी’ त्यामुळे चितपट झाला हे नक्की) राज्य शासनानंदेखील नजीकच्या काळात मतांसाठी काही चुकीचे निर्णय घेतले, तेही लोकांना पटले नव्हते. तरी सुद्धा हिंदूंनी (Hindu) भाजपाच्या चुका पोटात घालून त्यांना मतदान केलं, हे त्यांनी विसरू नये. आतातरी त्यांनी केवळ आणि केवळ हिंदूहित पाहावं.

अर्थात या यशाचं सर्वात जास्त श्रेय द्यायला हवं ते हिंदू मतदारांना. पण आत्ता जागे झालेल्या हिंदूंनी आपली जबाबदारी संपली, आता पाच वर्ष काही चिंता नाही असं म्हणत पुन्हा झोपी जाऊ नये. या निवडणुकीला धर्मयुद्ध म्हटलं गेलं आहे, ते अगदी योग्य आहे. आत्ता केवळ एक लढाई आपण जिंकली आहे. युद्ध चालूच राहणार आहे. इस्लामच्या स्थापनेपासूनच दारूल इस्लाम हेच मुस्लिमांचं लक्ष्य आहे. जगभरात आणि आपल्या देशातही त्याच दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच पद्धतशीरपणे ते पावलं टाकत आहेत. तुमच्या जागा, तुमच्या जमिनी, तुमचे व्यवसाय ते ताब्यात घेत आहेत. हिंदुस्थानातील पाकिस्तानपेक्षा जास्त जमीन वक्फनं ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला वक्फ म्हणजे काय थोडं, थोडं कळू लागलं आहे. भारतातील सर्व हिंदू (Hindu) विरोधी कायदे ही मुस्लिमधार्जिण्या कॉंग्रेसची आपल्यावरची कृपा आहे. त्यामुळे कॉंग्रेसला आणि त्यांच्या बरोबरील सर्व पक्षांना अगदी उबाठा शिवसेनेलाही, हिंदूंनी आपल्या अस्तित्वासाठी सत्तेपासून कायमच दूर ठेऊन देशाची सत्ता हिंदुत्ववाद्यांकडे राहील याची निश्चिती करणं अत्यावश्यक आहे. हिंदूंच्या अस्तित्वासाठी सुरू झालेलं हे युद्ध सहजी संपणारं नाही. त्यामुळे पैशाच्या मोहात अजिबात न पडता, व्यवहार करताना, खरेदी – विक्री करताना, नातेसंबंध जोडताना हिंदूंनी काळजी घेणं आवश्यक आहे. ‘फुको, थुको, कुछ भी करो, दो रुपये सस्ता मिला तो भी हिंदू हमसे खरीदेगा’ अशी त्यांनी जाहीरपणे आपली किंमत केलेली आहे. त्यामुळे जागे व्हा, सावध व्हा.

१९४७ मध्ये ‘हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्थान’ हा त्यांचा नारा होता. आता ‘हसके ही लिया हिंदुस्थान’ अशी गत व्हायला नको असेल तर मतदार राजा कायमच जागा रहा. पुन्हा झोपी गेलास तर तुझ्या पुढच्या पिढ्याही कायमच्या झोपी जातील हे विसरू नकोस!

निवडणूक होऊन चार दिवस झाले नाहीत तोच समाज माध्यमांवर महाराष्ट्राचा गुजरात होईल असल्या चर्चा सुरूही झाल्या, याचं वैषम्य आहे. आपण नाहीच का सुधारणार? या क्षणी आपला शत्रू कोण हेच कळत नाही का आपल्याला? जातपात, भाषा, प्रांत यात आतातरी अडकू नका. तुमच्या विजयानं, तुमचा शत्रू डिवचला गेला आहे, चवताळला आहे. तो घाबरला आहे अशा भ्रमात राहू नका. त्याची पुढची रणनिती ठरली पण असेल, आपण नेहमीप्रमाणे पुन्हा झोपी जाणार आणि आपसात भांडत राहणार याचीही त्याला खात्री आहे. त्यामुळेच ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’, हे प्रत्येकानं स्वतःच्या अंतापर्यंत लक्षात ठेवलं तरच आपलं अस्तित्व टिकणार आहे.

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.