‘हलाल’च्‍या सक्‍तीला ‘झटका’ देण्‍यासाठी हिंदूंची एकजूट हवीच!

186

आज भारतात ‘सेक्‍युलर’ राज्‍यव्‍यवस्‍था असतांनाही अल्‍पसंख्‍यांकांचे विशेष लाड केले जात आहेत, तर बहुसंख्‍य हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवून दुय्‍यम दर्जाचे नागरिक बनवले गेले आहे. हज यात्रेला किंवा जेरुसलेम येथील यात्रेला दिले जाणारे अनुदान असो, मशिदींतून ध्‍वनिवर्धकांच्‍या द्वारे केले जाणारे बेकायदेशीर ध्‍वनिप्रदूषण असो, हिंदू मुलींचे आयुष्‍य उद़्‍ध्‍वस्‍त करणारे लव्‍ह जिहादचे षडयंत्र असो किंवा हल्लीच उघड झालेले वक्‍फ बोर्डाच्‍या माध्‍यमातून भारतातील जमिनी बळकावण्‍याचे लँड जिहादचे कारस्‍थान असो, प्रत्‍येक ठिकाणी हिंदू सरकार आणि न्‍यायालये यांच्‍याकडून न्‍याय मिळण्‍याची अपेक्षा करत बसलेला आहे. या प्रकरणांतील आक्रमकांना कायद्याची आणि सरकारची जणू काही भीतीच उरलेली नाही, असे वातावरण आहे. भारताला इस्‍लामिक देश बनवण्‍याचे ‘व्हिजन २०४७’चा मसुदा बनवणाऱ्या पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)च्‍या उघड देशविरोधी कारवाया बंद करण्‍यासाठीही ८ वर्षे जावी लागली. यातच आता नवे संकट हे भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवरील आक्रमणाचे अर्थात हलाल अर्थव्‍यवस्‍थेचे आहे. भारतात शरीयतच्‍या नियमांनुसार हलाल भोजन मिळण्‍यासाठी आग्रह करता करता हलालच्‍या माध्‍यमातून एक अर्थव्‍यवस्‍था उभी केली गेली. हिंदूंनाच त्‍यात ग्राहक बनवून हलाल अर्थव्‍यवस्‍थेचा विस्‍तार केला जात आहे. पीएफआयच्‍या कारवायांमुळे त्‍यावर सरकारला बंदी घालता आली; मात्र हलाल अर्थव्‍यवस्‍थेवर बंदी कशी घालणार, हा मोठा प्रश्‍नच आहे. त्‍या दृष्टीने देशातील बहुसंख्‍य हिंदूंनीच पुढाकार घेऊन ग्राहक अधिकारांचा आणि संविधानिक स्‍वातंत्र्याचा वापर करून या हलाल उत्‍पादनांवर बहिष्‍कार घातला पाहिजे, तसेच सरकारलाही याकडे गांभीर्याने लक्ष घालण्‍यास भाग पाडले पाहिजे.

(हेही वाचा ‘हलाल’च्या विरोधात हिंदूंचा जनक्षोभ उसळणार – डाॅ. उदय धुरी)

हलाल पदार्थांवर बहिष्‍कार घालून निषेध व्‍यक्‍त करा

हलालच्‍या व्‍यवसायाची तीव्रता एवढी वाढलेली आहे की, आता मुस्‍लिम संस्‍था हलालची केवळ सक्‍तीच करत नाहीत, तर त्‍यासाठी आक्रमण करण्‍यापर्यंत त्‍यांची मजल पोहोचली आहे. केरळ राज्‍यात हलाल मांसाच्‍या विरोधात जाऊन स्‍वतःचा मांसचा व्‍यापार करणाऱ्या शाजी वर्गिस या ख्रिस्‍ती व्‍यापाऱ्याला रस्‍त्‍यात अडवून कच्चे मांस त्‍याच्‍या तोंडात कोंबले, इतकेच नव्‍हे तर त्‍याचा टेम्‍पोही जाळून टाकण्‍यात आला. त्‍यानंतर नुकतीच कर्नाटक राज्‍यातील सुळ्‍या या तालुक्‍यात भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेत्तारु याची हत्‍या करण्‍यात आली. पोलीस तपासात उघड झाले की, त्‍याच्‍या हत्‍येचे कारण नुपूर शर्मा यांचे वक्‍तव्‍य नसून, त्‍याने हिंदूंनी हलाल मांस घेऊ नये म्‍हणून चालवलेली हलालविरोधी मोहीम आणि तिला मिळणारा प्रतिसाद होता. त्‍याने स्‍वतःच मांसाचे दुकानही चालू केले होते. त्‍यामुळे चिडून मुसलमानांनी त्‍याची त्‍याच्‍या मांसाच्‍या दुकानाच्‍या समोरच हत्‍या केली. जर हे हलाल प्रमाणपत्र आणि अर्थव्‍यवस्‍था सामान्‍य असती, तर ही आक्रमणे कशासाठी केली गेली असती ? त्‍यामुळेच यामागील अर्थकारण आणि त्‍या पैशाचा केला जाणारा वापर पहाणे आवश्‍यक आहे. हलाल प्रमाणपत्र देणारी ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ ही संस्‍था तर उघडपणे पकडल्‍या गेलेल्‍या मुस्लिम आतंकवादी युवकांना न्‍यायालयीन साहाय्‍य उपलब्‍ध करून देत आहे. हे त्‍याहून अधिक भयंकर आहे. या सर्व दृष्टीने आता हिंदू समाजानेच पुढाकार घेऊन या हलाल अर्थव्‍यवस्‍थेला पायबंद घातला पाहिजे. हिंदूंनी त्‍यांचा ग्राहक अधिकार आणि संविधानिक अधिकार म्‍हणून हलाल पदार्थांवर बहिष्‍कार घालून निषेध व्‍यक्‍त केला पाहिजे.

(हेही वाचा काय आहे हलाल जिहाद? जाणून घ्या…)

विषय आर्थिक दादागिरीचा..!

मलेशियातील हलाल परिषदेत जागतिक स्‍तरावर सर्व मुस्लिम देशांनी केवळ हलाल प्रमाणित पदार्थ, औषधे आयात करण्‍याचा नियम केल्‍यामुळे जगभरातील गैर-मुसलमान देशांसह भारतातही या हलाल प्रमाणपत्राची आवश्‍यकता निर्माण झाली. हे प्रमाणपत्र देण्‍याचा अधिकार सरकारी संस्‍थेला न देता, तो मुस्लिम संघटनांनी, मदरशातून चालवल्‍या जाणाऱ्या संस्‍थांनी स्‍वतःकडे घेतल्‍यामुळे त्‍यांना आयतेच उत्‍पन्नाचे साधन उपलब्‍ध झाले. या माध्‍यमातून या संस्‍था कोट्यवधी रुपये गोळा करत आहेत. सरकारच्‍या एफडीए , एफएसएसएआय सारख्‍या प्रमाणित करणाऱ्या संस्‍था असतांनाही आज भारतात मौलानांचे नियम अधिक ताकदवान बनले आहेत. इतकेच काय तर आटा, नमकीन, चहा, साखर, शीतपेये, औषधे, सौंदर्यप्रसाधने, असा हळुहळू प्रवास करतांना ही हलाल प्रमाणपत्रे डेटिंग वेबसाईट, इमारती, फॅशन, मॉल्‍स, रुग्‍णालये, पर्यटन अशा क्षेत्रांतही चालू झाली आहेत. ‘मिंगल डॉट कॉम’सारख्‍या डेटिंग वेबसाईटला हलाल ठरवण्‍याचा अधिकार या संस्‍थांना कोणत्‍या धार्मिकतेच्‍या, ग्रंथाच्‍या आधारे मिळत आहे ? यातूनच लक्षात येते की, हा विषय केवळ धार्मिकतेचा नसून तो आता आर्थिक दादागिरीचा बनलेला आहे. मुसलमान ग्राहक हवे असतील, तर तुम्‍हाला आजचा सेक्‍युलर जिझिया कर, म्‍हणजे हलाल प्रमाणपत्रासाठी शुल्‍क द्यावे लागणार आहे. आश्‍चर्य म्‍हणजे सरकारकडून या बेकायदेशीर प्रमाणपत्र देणाऱ्या संस्‍थांवर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही.

(हेही वाचा मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या)

  • हलाल सक्‍तीविरोधी कृती समितीत सहभागी व्‍हा !
  • हलाल उत्‍पादनांवर बहिष्‍कार टाका !
  • सरकारला हलाल सक्‍तीच्‍या विरोधात पत्र-निवेदने पाठवा !
  • मॅकडोनाल्‍ड आदी हलाल उपाहारगृहांना सनदशीर मार्गाने विरोध करा !
  • भारतातील बेकायदेशीर ‘हलाल सर्टिफिकेट’ बंद करण्‍यासाठी प्रयत्न करा !
  • रमेश शिंदे – राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदू जनजागृती समिती
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.