Muslim Attack : तेलंगाणामध्ये होळी साजरी करणार्‍या हिंदूंवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून हल्ला

312

तेलंगणातील मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील चेंगीचेर्ला भागात होळीचा सण साजरा करत असतांना धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर हल्ला (Muslim Attack) केला. येथील मशिदीजवळ होळी पेटवल्यानंतर नमाज पठणाच्या वेळी ध्वनीक्षेपकावर गाणी लावल्यावरून ही घटना घडली. यात महिलांसह अनेक लोक जखमी झाले. ही घटना २४ मार्चला सायंकाळी घडली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला.

ए.एन्.आय. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, चेंगीचेर्लाच्या ब्रास बस्तीमध्ये होळी साजरी करतांना काही लोकांनी ध्वनीक्षेपक लावला होता. तेव्हा मुसलमानांनी (Muslim Attack) तो बंद करण्यास सांगितले, ज्यामुळे वाद झाला आणि त्यातून आक्रमणाची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

(हेही वाचा दारू घोटाळ्यादरम्यान मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांनी वापरलेला मोबाईल फोन गायब)

दारूच्या दुकानात चोरी !

दुसरीकडे तेलंगाणातील खम्मम भागातील टेकुलापल्ली परिसरातील दारूच्या दुकानांवरहल्ला करून तेथून दारूच्या पेट्या पळवून नेण्यात आल्या. यामध्ये महिलांचाही सहभाग होता. त्या दारूच्या पेट्या पळवतांना दिसत होत्या. अनुमाने १५ ते २० लाख रुपयांची दारू चोरून नेल्याचा आरोप दुकान मालकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.