हिंदुस्थान पोस्ट च्या बातमीवर शिक्कामोर्तब : उबाठा गट सर्व महानगरपालिका निवडणूका स्वबळावर लढणार; Sanjay Raut यांची घोषणा

130
हिंदुस्थान पोस्ट च्या बातमीवर शिक्कामोर्तब : उबाठा गट सर्व महानगरपालिका निवडणूका स्वबळावर लढणार; Sanjay Raut यांची घोषणा
हिंदुस्थान पोस्ट च्या बातमीवर शिक्कामोर्तब : उबाठा गट सर्व महानगरपालिका निवडणूका स्वबळावर लढणार; Sanjay Raut यांची घोषणा
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुस्थान पोस्टने प्रसिद्ध केलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब करताना राऊत यांनी सांगितले की, मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या सर्व महानगरपालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहे. (Sanjay Raut)
संजय राऊत म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेना गटाने स्वबळावर लढावे, कारण लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना नेहमी संधी मिळत नाही. त्यामुळे या निवडणुकांमधून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.” (Sanjay Raut)
स्वबळाचा नारा का दिला ?
संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, “आपला मतदार आपल्या कडेच राहावा, आणि हिंदुत्व व मराठी अस्मिता यांचे रक्षण व्हावे, यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता ही पक्षाची ताकद आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही हा निर्णय घेतला आहे.”  (Sanjay Raut)
इंडि आघाडीवरही मतभेद ?
इंडि आघाडीमधील विसंवाद आणि स्वबळाचा नारा यामध्ये काही संबंध आहे का, यावर राऊत यांनी भाष्य केले नाही. मात्र, त्यांनी असा दावा केला की, स्वबळावर लढणे हा शिवसेनेचा स्वाभाविक विचार आहे. “इंडिया आघाडीमध्ये असताना, स्थानिक पातळीवर स्वबळावर लढणे शक्य आहे,” असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न
महानगरपालिका निवडणुका या शिवसेना ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत, आणि या निवडणुका पक्षाच्या प्रभावासाठी निर्णायक ठरतात. कार्यकर्त्यांना या निवडणुकांमधून नेतृत्व करण्याची संधी देण्यात येणार असल्याचे सांगून राऊत यांनी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. (Sanjay Raut)
हिंदुत्व व मराठी अस्मितेवर भर
“हिंदुत्व आणि मराठी अस्मिता हे आमचे मूळ मुद्दे आहेत. या निवडणुकांमध्ये हे मुद्दे सुटणार नाहीत याची हमी आम्ही देऊ. आमचे मतदार व कार्यकर्ते हेच शिवसेनेचे खरे बळ आहे,” असे राऊत म्हणाले.  (Sanjay Raut)
महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू
महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे पक्षाच्या ताकदीत भर पडेल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, शिवसेना ठाकरे गटाच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sanjay Raut)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.