नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या आमदारांनी कार्यभार स्वीकारल्यावर महिन्याभरातच मतदार संघातील पाण्याच्या मुद्द्यावर या निवडून आलेल्या आमदाराने पक्षश्रेष्ठींना थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे. मतदारसंघातील शेतकरी पाण्यासाठी त्रस्त आहेत. आदिवासींना शेतीसाठी अनेक वर्ष पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांच्याविषयी जलसंपदा विभागाकडून उपेक्षा केली जाते. इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचा संताप आहे. इगतपुरी तालुक्यातील धरणांचे पाणी शहापूरला दिल्यास प्रसंगी आमदारकीचा राजीनामाच देऊ, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. (Hiraman Khoskar)
विधिमंडळात भावली धरणाचे पाणी अन्य जिल्ह्यांना देण्यात आमदार खोसकर यांनी तीव्र विरोध केला होता. याबाबत त्यांनी जलसंपदा विभागासह संबंधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे. अधिवेशन संपल्यानंतर सध्या ते मतदारसंघात आले आहेत आपल्या त्या मागणीसाठी आपण ठाम असून राज्य शासनाने भावली धरणाचे पाणी अन्य जिल्ह्यांना दिल्यास आपण राजीनामा देऊ यावर ठाम आहोत, असा दावा त्यांनी केला आहे. (Hiraman Khoskar)
(हेही वाचा- ED Raid On Canada Colleges : ईडीची आठ ठिकाणी छापेमारी; कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर मतदारसंघातील मतदारांच्या अडचणींसाठी आक्रमक झाले आहेत. मतदारसंघातील धरणांचे पाणी अन्य जिल्ह्यांना दिले जाते. मात्र मतदारसंघातील आदिवासी आणि शेतकरी शासनाच्या उदासीनतेमुळे उपेक्षित राहतात, अशी नाराजी खोसकर यांनी व्यक्त केली आहे. (Hiraman Khoskar)
मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी मतदारसंघातील भावली धरणाच्या पाण्यासाठी साकडे घातले आहे. इगतपुरीच्या भावली धरणाचे पाणी शहापूर तालुक्याला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. (Hiraman Khoskar)
काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून खोसकर २०१९ ला निवडून आले होते. त्यांच्यावर क्रॉस वोटिंग चा आरोप करण्यात आला. काँग्रेस पक्षातील अंतर्गत विसंवादातून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. (Hiraman Khoskar)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यावर त्यांनी इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी केली. ते दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. निवडणुकीचा निकाल लागून महिनाही झाला नाही, तोच त्यांनी थेट पक्ष नेत्यांना आणि सरकारला राजीनाम्याचा इशारा दिल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. (Hiraman Khoskar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community