राज्यात विधानसभा निवकडणुकीचे बिगुल वाजले असून, यासाठी सर्वच राजकीय पक्षानी प्रचार सभांचा धडाका सुरू केला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होणार आहे. दरम्यान एमआयएमने छत्रपती संभाजीनगरचे अकबरुद्दी ओवैसी यांनी उमेदवार नासिर सिद्दिकी (Nasir Siddiqui) यांच्या प्रचारसभेत वादग्रस्त विधान केले आहेत. या प्रचारसभेत बोलताना सिद्दिकी यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता थेट केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) पलटवार केला आहे. हे नेमके प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) यांनी सिद्दिकी यांच्यासाठी संभाजीनगर येथे प्रचार सभा घेतली. यावेळी सिद्दिकी यांनी एक पाच फूट, ५ रुपयांचा पेप्सीवाला मशिदीत घुसून मारू अशी भाषा करतो. त्याची एवढी हिंमत वाढली आहे. मी पण तुम्हाला सांगतो की. त्याला विधानसभेत घुसून मारण्याची ताकद ठेवतो. अशा प्रकारचे विधान सिद्दिकी यांनी नितेश राणेंबाबत नाव न घेता केले आहे. त्यावर आता नारायण राणे आपल्या मुलाच्या मदतीला धावून आले आहेत. नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील सिद्दिकी यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
काय म्हणाले खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे?
नासीर सिद्दीकी यांनी आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी जाहीर भाषणातून दिली. हा तोच पक्ष आहे, ज्याच्या प्रमुखांनी एक एक मुसलमान वीस हिंदूंना भारी पडेल अशी दर्पोक्ती केली होती. निजामशाहीच्या या पाठिराख्यांनी लक्षात ठेवावे देशात आता लांगुलचालन करणा-यांचे सरकार नसून बहुसंख्यांचे हितरक्षण करणारे सरकार आहे. नितेश राणे व हिंदू विरोधात गरळ ओकणा-यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील.
निजामशाहीच्या पाठीराख्यांना इशारा pic.twitter.com/1fWNOluzIz
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 6, 2024
नितेश राणे (Nitesh Rane) सातत्याने हिंदू जनजागरण समितीच्या (Hindu Janajagaran Samiti) माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये यात्रा काढत आहेत. आपल्या भाषणातून ते मुस्लिम समाजविरुद्ध वादग्रस्त वक्तव्ये करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. दरम्यान याच मुद्यावरून बोलताना एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) उमेदवार नासिर सिद्दीकी यांनी नितेश राणे यांना नाव न घेता धमकीवजा इशारा दिल्याचे म्हटले जात आहे.
Join Our WhatsApp Community