विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी नितेश राणेंचा पुढाकार! काय घेतला निर्णय?

108

हिंदू जनजागृती समितीने राबविलेल्या गडकोट किल्ले संवर्धन मोहिमेची दखल भाजप आमदार नितेश राणे यांनी घेतली आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. नारायण राणे यांनी देखील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांना तातडीने या प्रश्नी काम करण्यास सांगितले आहे. त्या विभागाकडून विभागाकडून याविषयी पत्र प्राप्त झाले असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. ‘छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा राजकीय नव्हे, तर भावनिक विषय आहे. हिंदूंच्या संघटनासाठी तुम्ही केव्हाही हाक मारा आम्ही पूर्ण सहकार्य करू’, अशी ग्वाही भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिली.

हिंदु जनजागृती समितीने गडकोट संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत राबवलेल्या विजयदुर्ग किल्ला संवर्धन मोहिमेची नोंद आमदार नितेश राणे यांनी घेत समितीच्या येथील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर समितीचे डॉ. नितीन ढवण, सर्वश्री जयवंत सामंत आणि मिलिंद पारकर यांनी आमदार राणे यांची कुडाळ तालुक्यातील पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलच्या कार्यालयात भेट घेतली. या वळी आमदार राणे यांना हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि समितीने हाती घेतलेल्या राज्यातील गडकोट संवर्धन मोहिमेची माहिती देण्यात आली. तसेच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी निवेदन देऊन स्थानिक आमदार म्हणून याविषयी पाठपुरावा करावा, अशी विनंती करण्यात आली.

(हेही वाचा ‘संसद रत्न’ पुरस्कारांत महाराष्ट्रातील ‘या’ कन्यारत्नांनी मारली बाजी)

विजयदुर्गकरता पुरातत्व विभागाला करणार पाचारण

यावेळी आमदार राणे म्हणाले, आपण हिंदू संघटित नसल्याने धर्मांधांचे फावते आणि ते कुरघोडी करतात. ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार त्यामुळे फोफावत आहेत. सर्वत्र शाळांमध्ये मुले गणवेश परिधान करतात; मात्र काही जणांकडून ‘हिजाब’चा आग्रह धरला जात आहे. ही स्थिती पालटण्यासाठी सर्व हिंदु संघटनांनी एकत्र येऊन कार्य करायला हवे. हिंदूंमध्ये जागृती व्हायला हवी. हिंदूंचे संघटन करण्यासाठी जेथे आवश्यकता असेल, तेथे तुम्ही आम्हाला बोलवा, आपण अवश्य सहकार्य करू. विजयदुर्ग किल्ला हा माझ्या मतदारसंघातील किल्ला असून छत्रपती शिवराय हा आमच्या आस्थेचा विषय आहे. याविषयी समिती करत असलेल्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य राहील. विजयदुर्ग किल्ल्याच्या पाहाणीसाठी जेव्हा पुरातत्व विभागाची समिती येईल, तेव्हा हिंदु जनजागृती समितीलाही आमंत्रित करू, असे आमदार राणे यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.