रेड लाईट एरियातही ध्वजारोहण; ‘त्या’ घटकांनी दर्शवली उपस्थिती

114

भारताच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कामाठीपुरा येथे मुंबई किन्नर ट्रस्टच्या माध्यमातून ध्वजारोहण केले.  या ध्वजारोहणाला विभागातील किन्नर समाजातील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

red

संपूर्ण मुंबईत तिरंगामय झाली

स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात आले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून संपूर्ण मुंबईत तिरंगामय झाली आहे. त्यामुळे मुंबईतील विविध सरकारी कार्यालयांसह विविध वस्त्या आणि इमारतींमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. महापालिकेच्या ई विभागाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक २१२ आणि २१३ मध्ये मुंबई किन्नर ट्रस्टच्या माध्यमातून लकी कंपाऊंड येथे तृतीय पंथीयांकडून ध्वजारोहण करण्यात आले. मुंबई किन्नर ट्रस्ट, मुंबई सात नायक किन्नर पंच आदींच्या माध्यमातून ध्वजारोहण केले.

(हेही वाचा भारतीय नौदलाकडून आगळीवेगळी सलामी! शूरवीरांनी उरणच्या समुद्रात फडकवला तिरंगा)

महिलांच्यावतीनेही ग्रेस फाऊंडेशनच्या माध्यमातून ध्वजारोहण 

तसेच कामाठीपुरा येथील १४ वी गल्लीतील रेड लाईट एरियातील शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्यावतीनेही ग्रेस फाऊंडेशनच्या माध्यमातून ध्वजारोहण करण्यात आले.  या ध्वजारोहणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या ई विभाग कार्यालयाने विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी  ई विभागाचे परिरक्षण खात्याचे सहायक अभियंता दिपक झुंजार, दुय्यम अभियंता सचिन सोनवणे, दुय्यम अभियंता शिवानंद जाधव, कनिष्ठ अभियंता किशोर जगदाळे, कनिष्ठ अभियंता धनंजय यादव व कनिष्ठ अभियंता चिराग सय्यद आदी उपस्थित होते.

red1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.