शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ई़डीने शुक्रवारी, ११ मार्च रोजी चार तासांच्या चौकशीनंतर अटक केली. त्यानंतर त्यांना शनिवारी हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयाने ईडीच्या वकिलांनी त्यांची 14 दिवसांची कोठडी मागितली. पण न्यायालयाने सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विशेष म्हणजे न्यायालयात ईडीच्या वकिलांनी सुद्धा अनिल परब यांचं थेट नाव घेतल्याने आता या प्रकरणात अधिकृतपणे अनिल परब यांच्या नावाची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.
अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या माध्यमातून विभास साठे यांना 80 लाख रुपये दिले, असा दावा ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केला. तसेच बंगल्यांना रिसॉर्टमध्ये बदलण्याचा निर्णय अनिल परब यांनी घेतला, असे ईडीने न्यायालयात म्हटले आहे. विशेष म्हणजे ईडीने या प्रकरणाच्या तपासासाठी सदानंद कदम यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. पण सदानंद कदम यांच्या वकिलांनी या कारवाईला चांगलाच विरोध केला. ईडीने केलेली कारवाई कशाप्रकारे चुकीची आहे, असा युक्तिवाद सदानंद कदम यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. तर दुसरीकडे ईडीकडूनही जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अखेर न्यायालयाने संदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
(हेही वाचा युद्ध संपवण्यासाठी पुतीन करणार अणुबाॅम्बचा वापर?)
Join Our WhatsApp Community