Amit Shah : अमित शहा यांची चाणक्यनिती; २०२४ चा निकाल २०१९ सालचा रेकॉर्ड मोडणार

210
अमित शहा यांची चाणक्यनिती; २०२४ चा निकाल २०१९ सालचा रेकॉर्ड मोडणार
अमित शहा यांची चाणक्यनिती; २०२४ चा निकाल २०१९ सालचा रेकॉर्ड मोडणार

वंदना बर्वे

काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामाख्यापर्यंत पसरलेल्या भारताची धुरा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देण्याची भीष्मप्रतिज्ञा अमित शहा यांनी केली आहे. शाह गृहमंत्री असले तरी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण रणनिती तेच तयार करीत आहेत. भाजपातील सूत्राने ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २०१९ पेक्षा मोठे यश मिळवून देण्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या खांद्यावर घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता आणि अमित शहा यांची चाणक्यनिती मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणार असल्याची चर्चा मुख्यालयात ऐकायला मिळत आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेसला रालोआत सामील करुन घेणे हा शाह यांच्या रणनितीचाच भाग असल्याचे बोलले जात आहे. उद्या मंगळवार दि. १८ जुलै रोजी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये रालोआची बैठक होत आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहणार आहेत. एवढेच नव्हे तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षासोबत भाजपचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन रालोआची व्याप्ती वाढविण्याची शाह यांची योजना आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.

(हेही वाचा – पुढील चार दिवस पावसाचे; ‘या’ तीन जिल्हांना ‘ऑरेंज’ तर, १५ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट)

रालोआच्या कक्षा रूंदावण्यासोबतच शाह अनेक राज्यांतील राजकीय हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. ओबीसी आणि दलितांशी संबंधित छोट्या पक्षांच्या नेत्यांना ते सारखे भेटत आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांतील हालचालींवरही लक्ष ठेवून आहेत. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवून लोकसभेत त्याची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. तर, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामध्ये लोकसभेच्या जास्तीत जागा कशा जिंकता येतील यावर शाह मंथन करीत आहेत.

शाह यांनी रविवारी सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर आणि अरुण राजभर यांच्याशी चर्चा केली. ही बैठक रणनीतीचा भाग होय. याआधी अमित शाह यांनी जितन राम मांझी, दारा सिंह चौहान, नागमणी आदी नेत्यांची भेट घेतली आहे. उत्तरेकडील लहान-लहान पक्ष रालोआत परत येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. इतर राज्यांची जबाबदारी भाजपच्या अन्य नेत्यांकडे देण्यात आली असली तरी हे नेते सुध्दा शाह यांनाच थेट रिपोर्टिंग करतात. मोदी यांच्या लोकप्रियतेचा आधार घेत शहा यांनी 2019 पेक्षा 2024 मध्ये मोठा विजय मिळवून देण्याचा संकल्प सोडला असल्याची चर्चा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.