… तर काँग्रेस श्रीराम मंदिराला ‘बाबरी’ नावाचे कुलूप लावेल; गृहमंत्री Amit Shah यांचा आरोप

प्राणप्रतिष्ठापणाचे निमंत्रण सर्व विरोधी नेत्यांना दिले होते, पण त्यांनी ते नाकारले. कारण त्यांना व्होटबँकेची भीती होती, असे अमित शाह म्हणाले.

265
लोकसभा निवडणुकीनंतर जर देशात इंडी आघाडीचे सरकार आले तर अयोध्येच्या राम मंदिरावर ‘बाबरी’ नावाचे कुलूप लावले जाईल, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी केला. खेरी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अजय मिश्रा टेनी यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत अमित शाह (Amit Shah) संबोधित करत होते.
राम मंदिराचा मुद्दा ७० वर्षे प्रलंबित ठेवून काँग्रेसने फसवणूक केली. राम मंदिराचा खटला अवघ्या पाच वर्षात जिंकला. राम मंदिराचे भूमीपूजनही केले आणि प्राणप्रतिष्ठापणा करून जय श्रीरामची घोषणा दिली. प्राणप्रतिष्ठापणाचे निमंत्रण सर्व विरोधी नेत्यांना दिले होते, पण त्यांनी ते नाकारले. कारण त्यांना व्होटबँकेची भीती होती. मोदी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १९० जागा पार करत आहेत. मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चौथ्या टप्प्यात ४०० जागांच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहे. सपा, बसपा आणि काँग्रेस उद्ध्वस्त झाली आहे, असे अमित शाह (Amit Shah)  म्हणाले.
सुधारित नागरिकत्व कायद्याचा संदर्भ देत अमित शाह म्हणाले, मोदीजींनी नुकताच पाकिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन लोकांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आणला. खेरीमध्येही अनेकांकडे नागरिकत्व नाही. त्यांना नागरिकत्व मिळाले पाहिजे की नाही? असे म्हणत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर अमित शाह (Amit Shah) यांनी निशाणा साधला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.