“अतिक्रमण सोडाच पण सुईच्या टोकाएवढी जमीनही कुणी घेऊ शकणार नाही”, गृहमंत्र्यांनी चीनला खडसावले!

141

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशातील किबिथू या सीमावर्ती गावात ‘व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाचे’ उद्घाटन केले. चीनने भारताच्या ताब्यातील अरुणाचल प्रदेशच्या हद्दीतील काही ठिकाणांची नावे बदलली त्यामुळे चीनविरोधात संतापाची लाट देशभरात उसळली आहे. यावेळी अमित शाहांनी चीनला चांगलेच खडसावले आहे.

( हेही वाचा : National Safe Motherhood Day: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व व इतिहास)

“सुईच्या टोकाएवढी जमीनही कुणी घेऊ शकणार नाही” – अमित शाह

अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमावर्ती गावांकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन बदलला आहे, आता सीमावर्ती भागात भेट देणारे लोक ते शेवटचे गाव नव्हे तर भारताचे पहिले गाव म्हणून ओळखतात. सीमावर्ती भागाला पंतप्रधान मोदींचे प्राधान्य आहे, सीमेची सुरक्षा हीच देशाची सुरक्षा आहे, त्यामुळे सीमेवरील पायाभूत सुविधा वाढवण्याचे काम मोदी सरकार निरंतर करत आहे. पुढे ते म्हणाले, भारताच्या जमिनीकडे कुणीही डोळे वर करून बघू शकत नाही, सैनिकांच्या पराक्रमांमुळे आमची भूमी सुरक्षित आहे. आमच्या देशात अतिक्रमण सोडाच पण सुईच्या टोकाएवढी जमीनही कुणी घेऊ शकणार नाही अशा शब्दांत शाहांनी चीनला प्रतिउत्तर दिले आहे. आयटीबीपीचे जवान आणि सेना आमच्या सीमारेषांवर दिवसरात्र तैनात असल्यामुळे देशावर वाईट नजर टाकण्याची कुणाचीच हिंमत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

2014 ते 2023 या काळात 547 किलोमीटर लांबीच्या सीमेवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, सीमा भागात 1100 किलोमीटरहून जास्त लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. तसेच 1057 किलोमीटर अंतरावर फ्लडलाइटचे काम करण्यात आले आहे. 468 सीमा निरीक्षण चौक्या सुद्धा (बीओपी) उभारण्यात आल्या आहेत अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.