Lok Sabha Election 2024 : हट्टीपणा सोडा; व्यावहारिक विचार करा; जागा वाटपाबाबत अमित शाह यांचा महायुतीच्या पक्षांना सल्ला

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १६ जागा मागितल्यानंतर भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

190

सध्या lok sabha Election 2024 साठी जागा वाटपाबाबत जसा महाविकास आघाडीत वाद सुरु आहे, तसाच काहीसा महायुतीमध्येही सुरु आहे. त्यामुळेच भाजपाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवाराची घोषणा करण्यात आली नव्हती. आता हा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री अमित शाह हे मंगळवार, ५ मार्चपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली तेव्हा त्यांना आपल्याला लोकसभेप्रमाणे विधानसभेलादेखील एकत्रितपणे सामोरे जायचे आहे. आपल्या सगळ्यांसाठी लोकसभेची लढाई अत्यंत महत्त्वाची आहे. अशावेळी हट्टीपणा सोडा आणि लोकसभेसाठी व्यवहार्य जागावाटप करा, असा सल्ला दिला असल्याचे समजते.

(हेही वाचा Sandeshkhali : नराधम शाहजहान शेखची खैर नाही; बंगाल पोलिसांकडून तपास CBI ला देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश)

भाजपाची डोकेदुखी वाढली 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १६ जागा मागितल्यानंतर भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शाह यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथून आले. शाह यांनी अन्य चौघांसोबत सह्याद्री अतिथिगृहावर रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. भाजपाने केलेली सर्वेक्षणे, राज्यातील महायुतीची व महाविकास आघाडीची परिस्थिती, महायुतीत कोणत्या मतदारसंघात निवडून येण्याची कोणत्या पक्षाची क्षमता आहे, हे मुद्दे लक्षात घेऊन Lok Sabha Election 2024 साठी जागावाटप होणे आवश्यक असल्याचे मत शाह यांनी मांडले. हट्ट सोडा असे केवळ आपल्या दोघांनाच माझे म्हणणे नाही. भाजपचे नेतेदेखील अशा काही जागांसाठी अडून बसले असतील की जिथे भाजपापेक्षा मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, तेथे भाजपानेदेखील एक पाऊल मागे घेतले पाहिजे, असे शाह म्हणाल्याचे समजते.  ज्याचे खासदार त्याला संधी, असे सूत्र न ठेवता आगामी निवडणुकीत जिंकून येणारा उमेदवार कोणाकडे आहे हे बघितले पाहिजे. Lok Sabha Election 2024 साठी ४८ जागांचे महायुतीत कसे वाटप करायचे, या संदर्भातही शाह यांनी यावेळी चर्चा केल्याची माहिती आहे. ज्याचे खासदार त्याला संधी, असे सूत्र न ठेवता आगामी निवडणुकीत जिंकून येणारा उमेदवार कोणाकडे आहे हे बघितले पाहिजे, अशीही शाह म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.