CAA कायदा लागू केल्यावर गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

526

केंद्र सरकारने CAA कायद्याची देशभरात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये होणाऱ्या छळामुळे भारतात आलेल्या गैर मुस्लीम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिलेले आणखी एक वचन पूर्ण केल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा CAA मध्ये मुसलमानांचा समावेश का नाही ? CAA चा NRC शी काय संबंध आहे ?)

आसाममध्ये पहिल्यांदा याविरोधात आंदोलने सुरू

अमित शाह यांनी एक्सवर याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मोदी सरकारने आज नागरिकत्व सुधारण कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. या कायद्यामुळे आता पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक आधारावर छळलेल्या अल्पसंख्याकांना आपल्या देशाचे नागरिकत्व मिळू शकेल. या निर्णयासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एका वचनाची पूर्तता केली आहे आणि त्या देशांमध्ये राहणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी दिलेले वचन साकार केले आहे, अशा शब्दांत अमित शाह यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये CAA संसदेत मंजूर झाला होता. या कायद्याला राष्ट्रपतींची संमतीदेखील मिळाली होती. मात्र देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. ४ डिसेंबर २०१९ रोजी संसदेत विधेयक मांडले गेले तेव्हा आसाममध्ये पहिल्यांदा याविरोधात आंदोलने सुरू झाली. यानंतर CAA विरोधी आंदोलन दिल्लीसह मोठ्या शहरांमध्ये पसरले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.