विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी सायबर पोलिसांनी जवाब नोंदविला. याप्रकरणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी सहभागृहात स्थगन प्रस्ताव सादर केला. यालाच उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.
काय म्हणाले गृहमंत्री?
मला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास 37 वर्ष झाले आहे. विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. सभागृहाच्या प्रथा, परंपरा आणि प्रिव्हलेज याबाबतची मला माहीत आहे. विरोधी पक्षनेत्यांनाही प्रिव्हलेज काय आहे हे माहीत आहे. सदस्यांच्या प्रिव्हलेजबाबत दुमत नाही. तुम्ही ज्या केसेस वाचून दाखवल्या त्याबाबत कुणी विचारू शकत नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. यापुढे बोलताना ते असेही म्हणाले, मी कायदा शिकलो कदाचित माझ्या माहितीत फरक असेल. क्रिमिनल केसेसमध्ये कुणालही इम्युनिटी नाही. फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली. केवळ माहिती घेण्यासाठी नोटीस दिली. जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा किंवा कोणत्याही कटात फसविण्याचा सरकारचा संबंध नाही.
(हेही वाचा – बारावीचा पेपर फुटलाच नाही तर….; शिक्षणमंत्र्यांचं विधान परिषदेत निवेदन)
फोन टॅपिंग प्रकरणात कोणालाही फसविण्याचा प्रयत्न नाही
फोन टॅपिंग प्रकरणात कोणालाही फसविण्याचा प्रयत्न नाही. त्यामुळे विरोधकांनी आता हा वाद थांबविण्यात यावा, असे आवाहन दिलीप वळसे-पाटील यांनी केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या मुद्यावरून सोमवारी भाजपने विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात याबाबत निवेदन सादर केले. फोन टॅपिंग प्रकरणी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 24 जणांचे जबाब नोंदवण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांना याबाबत याआधीच प्रश्नावली पाठवण्यात आली होती. मात्र, त्यांना काही कारणास्तव त्याला उत्तर देणे शक्य झाले नाही, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community