कोरोनाच्या लाटेवर संशय घेणाऱ्या राज ठाकरेंना काय म्हणाले गृहमंत्री?

राजकीय पक्षांना आणि नेत्यांनी लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नये, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

90

लोकांच्या जीवपेक्षा अजेंडा महत्त्वाचा मानू नका गृहमंत्र्यांनी राज ठाकरेंना सुनावले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असताना, भाजप आणि मनसेकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. राज ठाकरे यांनीही कोरोनाच्या लाटेबाबत संशय व्यक्त केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांना जोरदार प्रतिउत्तर दिले. कोणत्याही राजकीय पक्षांनी लोकांच्या जीवापेक्षा आपला अजेंडा महत्त्वाचे मानू नका, अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी ठाकरे यांना खडे बोल सुनावले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

त्यामुळे मनसे आणि आघाडी सरकारमध्ये यावरून चांगलीच जुंपणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. सणासुदीच्या दिवसांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती टास्क फोर्सने वर्तवली आहे. राज्य सरकारने त्याचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार दहीहंडी साजरी करण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे असे म्हटले होते.

काय म्हणाले गृहमंत्री वळसे-पाटील?

त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केले. सर्व जगामध्ये आपण जी परिस्थिती पाहत आहेत. तज्ज्ञांचा म्हणण्याप्रमाणे तिसरी लाट येणार आहे. जर तिसरी लाट आली तर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. राजकीय पक्षांना आणि नेत्यांना विनंती आहे की त्यांनी लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नका आणि त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

(हेही वाचा : निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा “वाटाघाटीचा” धंदा… भाजपचा आरोप)

तात्काळ कारवाईचे आदेश

ठाण्यात बेकायदेशीर फेरीवाल्यांने सहाय्यक आयुक्त पिंगळे यांच्यावर हल्ला करत दोन बोटे कापली. हा प्रकार गंभीर असून ठाणे पोलिसांना याबाबत तात्काळ कारवाईचे आदेश दिल्याचे वळसे पाटील म्हणाले.

सहकार क्षेत्रातील बदलाचा फटका

सहकार क्षेत्रातील कायद्यात केंद्र सरकारने बदल केला आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रात याचे परिणाम सहन करावे लागतील. राज्य सरकारने याबाबत बैठक घेऊन विचार गट स्थापन केला आहे. आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा करण्यात येतील. आजच्या बैठकीत सादरीकरण केले असून येत्या तीन महिन्यात बदल होतील, असे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.