राजकीय राजकारणात सत्तासंर्घष सुरुच आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत बंडखोर आमदारांची सुरक्षा काढल्याचे सांगितले. आता यावर स्पष्टीकरण देत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांची सुरक्षा काढली नसल्याचे सांगितले. पोलीस त्यांचे काम करत राहणार. बंडखोर आमदारांचे कुटुंब सुरक्षित राहावे यासाठी त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा दिली जाणार असल्याचे. दिलीप वळसे पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत केलेले आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले आहेत.
( हेही वाचा संजय राऊत म्हणतात; 10 बंडखोर आमदार पवारांसमोर बोलले )
बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत, राज्यभरात शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचे कार्यालयांची तोडफोड सुरू केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्याचे गृहमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहे, त्याचबरोबर बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात येण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
शिवसैनिकांकडून तोडफोड
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या बंडखोरीमुळे दुखावले गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांना भावनिक साद घातल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांची कार्यालये लक्ष्य करून तोडफोड सुरू केली आहे. बंडखोर आमदारांचे पोस्टर, बॅनर फाडून शिवसैनिकांकडून राग व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस आपले कर्तव्य बजावताहेत
राज्यभरात शिवसैनिकांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवून बंडखोर आमदाराच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांना दिले आहे. तसेच कुठल्याही बंडखोर आमदारांचे पोलीस संरक्षण काढण्यात आलेले नसून, आमदारांच्या संरक्षणात असलेले आमदार राज्यात नसले तरी संरक्षणातील पोलीस आमदारांच्या कार्यालयातच बसून आपले कर्तव्य बजावत असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community