मुंबईचा वारसा असणाऱ्या मुंबईतील बीडीडी चाळीत पोलीस कर्मचारी आणि मराठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात राहतात. या चाळीसंदर्भात बुधवारी एक महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळीत आता हक्काचे घऱ मिळणार असल्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. बीडीडी चाळीत २२५० निवृत्त पोलिसांना घर मिळणार आहे. त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी ५० लाख रुपये घरासाठी किंमत द्यावी लागणार आहे. अशी माहिती आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटवर दिली आहे.
२२५० निवृत्त पोलीस कर्मचारी मिळणार घर
या बैठकीनंतर आव्हाडांनी किती पैसे भरावे लागणार आणि यासंदर्भात इतरही माहिती दिली आहे. बीडीडी चाळीत जे कर्मचारी इतके वर्ष राहतात त्यांना १ कोटी ५ लाख किंमतीच्या घरासाठी ५० लाख रूपये बांधकाम खर्च हा एका घरासाठी मोजावा लागणार आहे. आतापर्यंत २२५० पोलीस कर्मचारी निवृत्त झाले त्यांना त्याठिकाणी घरं दिली जाणार आहे. तसेच ही बिल्डिंग बनायला तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र या सगळ्यांना मोफत घर देऊ शकणार नाही, असेही आव्हाडांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी घर मिळणार असून त्यांना त्यासाठी किमान ५० लाख रूपये मोजावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – केतकीच्या अडचणीत वाढ,१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी)
हा निर्णय करारपत्रात नमूद करून करारपत्र त्वरीत दिली जातील. ह्या निमित्ताने सर्व काम मार्गी लागलेलं आहे. तेव्हा आता निवृत्त पोलिसांनी लवकरात लवकर आपली घरे खाली करावीत ही विनंती.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 18, 2022
ट्विटमध्ये काय म्हणाले आव्हाड?
बीडीडी चाळीच्या प्रत्येक घराचा बांधकाम खर्च हा अंदाजे १ कोटी ५ लाख ते १ कोटी १५ लाख इतका आहे. पण म्हाडाने येथे असलेल्या २२५० पोलीस कर्मचाऱ्यांना तोटा सहन करून ५० लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय करारपत्रात नमूद करून करारपत्र त्वरीत दिली जातील. ह्या निमित्ताने सर्व काम मार्गी लागलेलं आहे. तेव्हा आता निवृत्त पोलिसांनी लवकरात लवकर आपली घरे खाली करावीत अशी त्यांनी विनंती केली आहे.
Join Our WhatsApp Community