सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) पाठीत २.५ इंचाचा चाकू घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात गेल्यावर पाठीत रुतलेला चाकू काढण्यात आला. सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती. पाच दिवसांत उपचार घेऊन सैफ अली खान इतका फिट कसा?, अशी पोस्ट शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी X वर पोस्ट करून संशय व्यक्त केला.
मला लिलावती रुग्णालयावर प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. पण त्या रात्री नेमके काय झाले? हे सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. रुग्णालयात आणताना सैफ अली खानची नेमकी परिस्थिती कशी होती? त्याच्यावर किती काळ शस्त्रक्रिया चालली. हे सर्व जनतेला कळले पाहीजे, असेही निरुपम म्हणाले.
(हेही वाचा ED सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं; Bombay High Court ने ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड)
या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली. तिसरा आरोपी हाच खरा आरोपी असून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचा हा दावा खरा आहे ना? कारण मुंबई शहरात बांगलादेशी घुसखोरांचा मोठा प्रश्न आहे. जर आरोपी बांगलादेशी नागरिक असेल तर मुंबई पोलिसांना नव्याने अभियान सुरू करावे लागेल आणि बांगलादेशींना त्यांच्या देशात पुन्हा हुसकून लावावे लागेल. तरच मुंबईला सुरक्षित राखता येईल, असे निरुपम म्हणाले.
Join Our WhatsApp Community