इस्लामी धर्मग्रंथांमध्ये मांस वगळता अन्य क्षेत्रांसाठी ‘हलाल’ संकल्पना स्पष्ट नाही. त्यामुळे मौलानांकडून ‘हलाल’ संकल्पनेचा विस्तार केला जात आहे. काही वर्षांपूर्वी ‘हराम’ मानल्या जाणाऱ्या गोष्टी मौलानांकडून आज ‘हलाल’ ठरवल्या जात आहेत. याचे उदाहरण म्हणजे, पूर्वी ‘अजान’ची हाक देण्यासाठी मानवनिर्मित ध्वनीक्षेपक यंत्राचा वापर करणे, हे ‘हराम’ मानले जात होते. आज त्याला ‘हलाल’ ठरवून प्रत्येक मशिदीवर बसवण्यात आले आहे. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून ‘मेकअप’ करण्याला ‘हराम’ मानले जात होते. आता मात्र सौंदर्यप्रसाधनांनाच ‘हलाल प्रमाणपत्र’ दिले जात आहे.
मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थ : आता मांसाहारी पदार्थच नव्हेत, तर सुप्रसिद्ध ‘हल्दीराम’चे शुद्ध शाकाहारी नमकीनसुद्धा ‘हलाल’ प्रमाणित झाले आहे.
धान्य, खाद्यतेल, गव्हाचे पीठ : आटा, सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, शीतपेये इत्यादींनाही ‘हलाल’ प्रमाणित करण्यात आले आहे.
औषधे : युनानी, आयुर्वेदीक औषधांतही ‘हलाल’ची संकल्पना लागू करण्यात आली आहे. तुळशीचा अर्क, चहा यांनाही ‘हलाल’ प्रमाणित केले जात आहे.
सौंदर्यप्रसाधने : साबण, काजळ, ‘शाम्पू’, ‘टूथपेस्ट’, ‘नेलपॉलिश’, ‘लिपस्टिक’ इत्यादी सौंदर्यप्रसाधनेही आता ‘हलाल’ प्रमाणित झाली आहेत.
(हेही वाचा भारत जोडो यात्रेत राहुल गांधी वादग्रस्त ख्रिस्ती धर्मगुरूला विचारतात, ‘येशू ख्रिस्त देवाचे रूप आहे का?’)
‘हलाल डेटिंग’ संकेतस्थळे : युवक-युवतींचा परिचय करून देणार्या ‘ऑनलाइन डेटिंग’ क्षेत्रातही शरीयतवर आधारित ‘हलाल डेटिंग वेबसाईट्स’ चालू आहेत.
‘हलाल’ घरगुती यांत्रिक उपकरणे : इंडोनेशियामध्ये तर ‘रेफ्रिजरेटर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’, या घरगुती यांत्रिक उपकरणांनाही ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यात आले.
‘हलाल’ प्रमाणित गृहसंकुल : केरळ राज्यातील कोची शहरात शरीयतच्या नियमांच्या आधारे ‘हलाल’ प्रमाणित गृहसंकुल बनत आहे.
‘हलाल’ प्रमाणित रुग्णालये : चेन्नई, तमिळनाडू येथील ‘ग्लोबल हेल्थ सिटी’ या रुग्णालयाला ‘हलाल प्रमाणित’ असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
‘हलाल टूरिजम’ : मुसलमानांचा पर्यटनासाठी खर्च होणारा पैसा इस्लामी देशांना मिळावा किंवा त्यांना आकर्षित करण्यासाठी अन्य देशांनी विशेष सुविधा द्याव्यात, हाही यामागचा एक उद्देश आहे.
‘हलाल’ मांस अनिवार्य करणाऱ्यांच्या विरुद्ध ग्राहक अधिकारांचा उपयोग करा ! : ‘हलाल’ची अनिवार्यता मुसलमानांसाठी आहे; अन्य धर्म-पंथियांसाठी नाही. त्यामुळे ‘हलाल’ मांस किंवा उत्पादने यांचे विक्रेते मुसलमानांना ‘हलाल’ मांसाची किंवा उत्पादनांची विक्री करू शकतात; मात्र हिंदूंनाही तेच ‘हलाल’ मांस किंवा उत्पादन घेण्याचा आग्रह करणे, हे ‘भारतीय संविधाना’ने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या तसेच ग्राहक अधिकारांच्या विरोधात आहे.
‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ.सी.’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी भारतातील त्यांची सर्व दुकाने १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित असल्याची घोषणा केली आहे. ‘मॅकडोनाल्ड’मध्ये जाणाऱ्या बहुसंख्य हिंदूंना इस्लामी मान्यतेनुसार ‘हलाल’ पदार्थच खाऊ घालणे, हा हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याचा अनादर आहे. त्यामुळे अशा बहुराष्ट्रीय आस्थापनांवर खटले दाखल केले पाहिजेत. अशाच पद्धतीने ‘भारतीय पर्यटन विकास महामंडळ’ (आय.टी.डी.सी.), आणि रेल्वेचे ‘आय.आर्.सी.टी.सी’, या शासकीय संस्थांवरही ‘हलाल’ मांस पुरवणाऱ्यांनाच कंत्राट देत असल्याचा आरोप होत होता. शासनावर दबाव आणून या शासकीय संस्थांमधून ‘हलाल’ भोजन अनिवार्य करणे बंद केले पाहिजे.
(हेही वाचा केवळ याकूब मेमनच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ गड-किल्ल्यांवरही कबरी उभारल्यात!)
भारतात ‘हलाल प्रमाणपत्र’ देणाऱ्या संस्था
- हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
- हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
- जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट आणि जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र
- हलाल कौन्सिल ऑफ इंडिया
- ग्लोबल इस्लामिक शरीया सर्व्हिसेस
‘हलाल प्रमाणपत्रा’च्या कृती शुल्क आकारणी (रुपयांत)
- नवीन नोंदणी (१ वर्षांसाठी) २५,००० + ५०० प्रति उत्पादन + जीएसटी
- नवीन नोंदणी (३ वर्षासाठी) ६०,००० + १५०० प्रति उत्पादन + जीएसटी
- उत्पादनावर ‘हलाल लोगो’ची छपाई २०,००० प्रति वर्ष + जीएसटी
- नूतनीकरण शुल्क (१ वर्षांसाठी) २०,००० आणि ५०० प्रति उत्पादन + जीएसटी
- नूतनीकरण शुल्क (३ वर्षासाठी) ५०,००० आणि १००० प्रति उत्पादन + जीएसटी
- निरीक्षकाचा (ऑडिटरचा) खर्च १००० (प्रति मनुष्य दिवस) + प्रवास, भोजन आणि निवास खर्च
- यातून हलाल प्रमाणपत्रासाठी किती भरमसाठ शुल्क आकारले जाते ?’, याची कल्पना येईल.
हलाल अर्थव्यवस्था जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था! : वर्ष २०१७ मध्ये ‘हलाल अर्थव्यवस्था’ २.१ ‘ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स’ (१ ‘ट्रिलीयन’ म्हणजे १ वर १२ शून्य) एवढी होती, तर वर्ष २०१९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था २.७ ‘ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स’ होती. ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा वेग पहाता ती लवकरच भारताच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकू शकते.
(हेही वाचा मुंबईत दहशतवादी याकूब मेननच्या कबरीचे उद्दात्तीकरण, कबरीचे मजारमध्ये रूपांतर?)
हिंदूंची हलालच्या विरोधात काय भूमिका असावी?
- हिंदूंनी विरोध केल्यानंतर ‘बिग बास्केट’ने ‘झटका’ मांस विकण्यास प्रारंभ केला. ‘ऑनलाइन’ खाद्यपदार्थ विकणाऱ्या ‘बिग बास्केट’ या आस्थापनाने घोषित केले की, ‘आम्ही केवळ ‘हलाल’ मांसाचीच विक्री करतो.’ त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी ‘बिग बास्केट’च्या विरोधात अभियान चालू केले. हिंदूंच्या या प्रखर विरोधामुळे त्यांनी माघार घेऊन आता ‘झटका’ मांसही उपलब्ध करून दिले आहे.
- ‘अल्लाह’ला अर्पण केलेले अन्न त्याला मानणारे मुसलमान खाऊ शकतात; मात्र तेच अन्न हिंदू, शीख आणि अन्य धर्म-पंथियांनी का ग्रहण करावे ?
- वर्ष २००७ मध्ये मध्यप्रदेश शासनाने ‘इस्कॉन’ मंदिराकडे शाळांमधील माध्यान्ह भोजन पुरवण्याचे कंत्राट दिल्यानंतर त्याला मुसलमानांनी विरोध केला होता.
- मुसलमान मौलवींचा दावा होता की, ‘इस्कॉन’ संस्था बनवलेले अन्न प्रथम श्री जगन्नाथाला अर्पण करते. त्यामुळे ‘तो प्रसाद मुसलमान मुलांना खाऊ घालणे’, हा इस्लामचा अपमान आहे. जर ‘इस्कॉन’ने बनवलेले भोजन मुसलमानांना चालत नाही, तर ‘हलाल’ भोजनाचा स्वीकार हिंदूंनी का केला पाहिजे?
(हेही वाचा अमरावतीत पुन्हा लव्ह जिहाद, पीडित तरुणीचे बळजबरीने लावले लग्न)
लेखक – सुनील घनवट, संघटक, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड.
Join Our WhatsApp Community