राज्यात मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन सुरु असताना मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द अंतिम शब्द असतो. त्यानुसार हे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार ४९२ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरूही झाली आहे, असे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठा आंदोलकांवरील (Maratha Reservation) मागे घेण्यात येणाऱ्या ४९२ गुन्ह्यांपैकी १७२ गुन्हे मागे घेण्याची शिफारशी करण्यात आली आहे. त्यातील केवळ ६ गुन्ह्यांवर थोडा विचार विनिमय सुरु आहे. मात्र ज्या ठिकाणी तोडफोड, जाळपोळ करण्यात आली, जे आंदोलक प्रत्यक्ष दिसत आहेत, त्या सर्वांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार नाही. त्यामुळे याबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नये. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community