ईडीने मंगळवारी, 5 एप्रिल 2022 रोजी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या मालकीच्या अलिबाग येथील 8 भूखंड आणि दादर येथील फ्लॅट जप्त केला. पत्राचाळ घोटाळ्यातून राऊत यांनी दादर येथील फ्लॅट खरेदी केल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे ईडी आता राऊत यांच्या संपत्तीची खोलवर जाऊन चौकशी करणार आहे. मात्र यानिमित्ताने राऊत यांच्याकडे किती संपत्ती आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.
किती आहे स्थावर आणि जंगम मालमत्ता?
जंगम मालमत्ता
- रोख रक्कम – 83 हजार रुपये
- विविध बॅंकांमधील ठेवी – 26 लाख 58 हजार 918 रुपये
- बॉण्ड – 32 हजार रूपये
- पोस्ट ठेवी – 5 लाख रूपये
- एलआयसी – 14 लाख 25 हजार 408 रुपये
- कर्ज रक्कम – 1 कोटी 50 लाख 17 हजार 820 रुपये
- वाहन – 1 कोटी 40 लाख 250 रुपये
- दागिणे – 25 लाख 88 हजार रुपये
- इतर मालमत्ता – 5 लाख 77 हजार रुपये
(हेही वाचा याची कल्पना होती, मला अटकही होईल!)
स्थावर मालमत्ता
- शेत जमीन (सर्व जागा अलिबाग, रायगड) (5 प्लॉट) – 2 कोटी 45 लाख 71 हजार रुपये
- अकृषीक जमीन (सर्व जागा अलिबाग, रायगड) (8 प्लॉट) – 50 लाख 46 हजार
- कार्यालये – 3 कोटी 76 लाख 20 हजार रुपये
- निवासी घर (भांडुप) – 5 कोटी 20 लाख
एकूण संपत्ती – 11 कोटी 92 लाख 37 हजार रुपये
(हेही वाचा संजय राऊत म्हणतात… याची कल्पना होती, मला अटकही होईल!)
Join Our WhatsApp Community