एकाच घरात भाजपा किती जणांना उमेदवारी देणार?; Nilesh Rane यांच्या उमेदवारीवरून महायुतीत अडचणी

71
एकाच घरात भाजपा किती जणांना उमेदवारी देणार?; Nilesh Rane यांच्या उमेदवारीवरून महायुतीत अडचणी
एकाच घरात भाजपा किती जणांना उमेदवारी देणार?; Nilesh Rane यांच्या उमेदवारीवरून महायुतीत अडचणी
मुंबई प्रतिनिधी 
विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आमदारकी लढवण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. यावेळी निलेश राणे विधानसभेत दिसणार असे सांगत, विधानसभा निवडणूक (Assembly Elections) लढणारच असे त्यांनी म्हटले आहे. राणे कोणत्या मतदार संघातून ते लढणार हे अजूनही स्पष्ट नाही. मात्र त्यांच्या निवडणूक लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीत (Mahayuti) आणि भाजपा (bjp) अंतर्गतही अनेक अडचणी येवू शकतात, अशी चर्चा आहे.  (Nilesh Rane )

लोकसभेला झाले तेच विधानसभेला होईल का ?

राणे कुडाळ-मालवण विधानसभा (Kudal-Malvan Assembly) मतदार संघातून तयारी करत आहेत. हा मतदार संघ तसा शिवसेनेचा आहे. त्यामुळे जागा वाटपात तो भाजपसाठी सुटेल का हा खरा प्रश्न आहे. लोकसभेला शिवसेना शिंदे गटाने आपल्या कोट्यातली जागा नारायण राणे यांच्यासाठी सोडली. त्यानंतर कुडाळ मालवणचीही जागा शिंदे राणेंसाठी सोडणार का ? यावर निलेश राणे यांचे भवितव्य अवलंबून आहे. (Nilesh Rane)

निष्ठावंतांची होत आहे घुसमट

दरम्यान एकाच घरात उमेदवारी किती जणांना दयायची हा प्रश्नही भाजप समोर असणार आहे. घराणेशाही विरोधात नेहमीच भाजपमध्ये बोलले जाते. स्थानिक भाजप पदाधिकारीही सर्वच राणेंना देणार तर मग आम्हाला काय ? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. जे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते आहेत त्यांची मात्र यात घुसमट होत असल्याचीही चर्चा आहे. निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदार संघात तयारी करत आहेत. इथे ठाकरे गटाचे वैभव नाईक सध्या आमदार आहेत. हा मतदार शिवसेनेचा आहे. त्यामुळे इथून शिंदे ही जागा सोडणार का ? हा खरा प्रश्न आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.