NDA अर्थात रालोआमध्ये कोणते आणि किती आहेत राजकीय पक्ष? 

212

सध्या देशात आतापासूनच २०२४च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपा हरवणे हे मोठे आव्हान विरोधकांसमोर आहे. त्यामुळे देशभरातील भाजप विरोधी पक्षांची एक मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मात्र त्याच वेळी भाजपनेही त्यांच्या मित्र पक्षांची एकजूट निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी NDA मध्ये अधिकाधिक पक्षांना सामावून घेत भाजप NDAची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू लागला आहे.

सध्याच्या घडीला रालोआकडे ३८ राजकीय पक्ष आहेत. या सर्व पक्षांची पहिली बैठक नुकतीच दिल्लीत संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. यात कोणते राजकीय पक्ष आहेत, याची माहिती जाणून घेऊया.

(हेही वाचा NDA vs India : दिल्लीमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधात पोलिस तक्रार)

पक्षाचे नाव पक्षाचे स्वरूप आणि चिन्ह 

  • भाजप – राष्ट्रीय पक्ष – कमळ
  • शिवसेना – प्रादेशिक पक्ष – धनुष्यबाण
  • राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्ष – प्रादेशिक पक्ष – घड्याळ
  • राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी – प्रादेशिक पक्ष – दाढीचे मशिन
  • लोक जनशक्ती पार्टी (राम विलास पासवान) – प्रादेशिक पक्ष – हेलिकाॅप्टर
  • डीएमके – प्रादेशिक पक्ष – दोन पान
  • अपना दल – प्रादेशिक पक्ष – कप बशी
  • एनपीपी – प्रादेशिक पक्ष – पुस्तक
  • एनडीपीपी – प्रादेशिक पक्ष – पृथ्वीचा नकाशा
  • एनपीएफ –  प्रादेशिक पक्ष – कोंबडा
  • एजेएसयु –  प्रादेशिक पक्ष – केळ
  • एसकेएम –  प्रादेशिक पक्ष  – टेबल लॅम्प
  • एमएनएफ –  प्रादेशिक पक्ष  – चांदणी
  • आयपीएफटी –  प्रादेशिक पक्ष – कापणीचे अवजार
  • आरपीआय (रामदास आठवले) – प्रादेशिक पक्ष – अशोक चक्र
  • एजीपी – प्रादेशिक पक्ष – हत्ती
  • पीएमके – प्रादेशिक पक्ष – आंबा
  • टीएमसी – प्रादेशिक पक्ष – फुलाचे झाड
  • युपीपीएल – प्रादेशिक पक्ष -ट्रक्टर
  • एसबीएसपी – प्रादेशिक पक्ष – छडी
  • शिरोमणी अकाली दल (संयुक्त) – प्रादेशिक पक्ष – टेलिफोन
  • एमजीपी – प्रादेशिक पक्ष – सिंह
  • जेजेपी –  प्रादेशिक पक्ष  – चावी
  • पीजेपी –  प्रादेशिक पक्ष  – निश्चित नाही
  • आरएसपीएस –  प्रादेशिक पक्ष – निश्चित नाही
  • जेएसएस –  प्रादेशिक पक्ष – निश्चित नाही
  • जीएनएलएफ – प्रादेशिक पक्ष – चाकू
  • पीटी – प्रादेशिक पक्ष -दोन पान
  • केरला कामराज कॅंाग्रेस – प्रादेशिक पक्ष -वर्तुळात दोन पान
  • बीडीजेएस – प्रादेशिक पक्ष – नमस्काराची मुद्रा
  • हरियाणा लोकहित पार्टी – प्रादेशिक पक्ष – पतंग
  • जेएसपी – प्रादेशिक पक्ष – ग्लास
  • एचएएम –  प्रादेशिक पक्ष – निश्चित नाही
  • एआयएनआरसी – प्रादेशिक पक्ष – निश्चित नाही
  • निषाद पार्टी – प्रादेशिक पक्ष – निश्चित नाही
  • एचएसपीडीपी – प्रादेशिक पक्ष – निश्चित नाही
  • युनायटेड डेमोक्रॅटीक पार्टी – प्रादेशिक पक्ष – ड्रम
  • केपीए – प्रादेशिक पक्ष – निश्चित नाही
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.