महायुतीतील घटक पक्षांना किती जागा मिळणार? Vinod Tawde यांनी दिली आकडेवारी 

129

निवडणुकीत लढवण्याचा जागांचा आकडा हा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बनवत असतो. त्यासाठी त्या-त्या पक्षाला आवश्यक होता आणि महायुती म्हणून एकसंघ राहणे, ही आजची गरज आहे. त्यामुळे उगाच जागावाटपावरून भांडण करण्यात काही अर्थ नाही. अजून प्रचाराचे दिवस आहेत. मोदी, अमित भाईंचे प्रचार दौरे सुरू झालेत. १५५ ते १६० जागांपर्यंत महायुती जाईल. आणि उरलेल्या जागांमध्ये महाविकास आघाडी असेल, अशी आजची स्थिती मी बघतोय, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) म्हणाले.

(हेही वाचा “महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे अफवा, ते विकास करणार नाहीत” – भाजपा नेते Chandrashekhar Bawankule)

भाजपाला ९० ते १०० दरम्यान जागा असतील. चांगला स्ट्राईक रेट राखला जाईल. एकनाथ शिंदेंना ४० पर्यंत…ते अंदाज करत आहेत. आणि अजित पवारांना २० ते २५ जागा मिळतील. आज अजून प्रचारानंतर त्यांच्या जागा वाढू शकतात, असा अंदाज विनोद तावडे यांनी मांडला. मविआमध्ये जास्त काँग्रेसचा स्ट्राईक रेट असेल. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि त्यानंतर उबाठा, असेही तावडे  (Vinod Tawde) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.