-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे प्रचारसभेदरम्यान होणाऱ्या बॅगांची तपासणीबाबत बोलतांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या बॅगा कसल्या तपासता, त्यांच्या घरी जाणाऱ्या बॅगा तपासा. बॅगांची तपासणी केली म्हणून त्याचा राग का असावा असा सवाल त्यांनी केला. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बॅगा चालत नाही तर त्यांना कंटेनर लागतात असाही टोला शिंदे यांनी केला. दरम्यान महायुतीच्या १६० पेक्षा अधिक जागा येणार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमच्यावर पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप केला जातो. पण पक्ष आणि चिन्ह हे काय खेळणे आहे का असा सवाल करत उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) हे लहान मुलांसारखे रडत आहेत. पण लोकशाहीत बहुमताला महत्व आहे आणि आमचे सरकार हे बहुमतात आहे. यावेळी त्यांनी उबाठा शिवसेना हेच दराडेखोर असल्याचे सांगत शिंदे यांनी मुंबई महापालिका ही त्यांच्या शिवसेनेच्या ताबयात होती. कोविडमध्ये ही महापालिका कोणी लुटली? खिचडी, शव पिशवी (डेड बॉडी बॅग) कोण जेलमध्ये गेले? मुंबईला खड्डयात कुणी टाकले? म्हणून मुंबईतील रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचा निर्णय घेतला? आम्ही कामे केली आहे आणि करतो आहे. त्यामुळे दरोडेखोर कोण? आम्ही महापालिकेच्या रस्त्यांची कामे करतो, नाल्यांची सफाई करतो, पण हे २५ वर्षांपासून तिजोरी साफ करत होते. त्यामुळे माझ्यापेक्षा हा शब्द त्यांनाच अधिक लागतो.
(हेही वाचा – धारावीतील ITI चोरीला, माजी खासदार राहुल शेवाळेंचा आरोप)
बटेंगे ते कटैंग, एक है तो सेफ है अशा घोषणा दिल्या जातात, यावर विचारले असता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की याचा अर्थ सर्वांनी एकत्र येणे असा आहे. लोकसभेला धर्माचे राजकारण खेळले गेले, संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला गेला, दलित, आदिवासी तसेच समाजाला घाबरवले गले. लोकशाही प्रगल्भ करणे म्हणजे मतांची टक्केवारी वाढवणे हे आवश्यक असते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून मतदान करावे असाही त्याचा अर्थ होतो.
महायुतीच्या १६० पेक्षा अधिक येणार जागा
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला, भाजपा किंवा राष्ट्रवादीला किती जागा मिळतील यापेक्षा महायुतीला जास्तीत जागा मिळणे आणि महायुतीचे सरकार आणणे हेच ध्येय असल्याचे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुती बहुमतात येणार असून महायुतीला १६० पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वासही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community