Maharashtra Budget 2025 च्या अर्थसंकल्पात कोणत्या विभागासाठी किती तरतूद? वाचा सविस्तर

36
Maharashtra Budget 2025 च्या अर्थसंकल्पात कोणत्या विभागासाठी किती तरतूद? वाचा सविस्तर
Maharashtra Budget 2025 च्या अर्थसंकल्पात कोणत्या विभागासाठी किती तरतूद? वाचा सविस्तर

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केलेल्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात (Budget)
विविध खात्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिला आणि बालविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ग्रामविकास, नगरविकास आणि कृषी या क्षेत्रांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. (Maharashtra Budget 2025)

( हेही वाचा : Budget Session 2025: जात वैधता पडताळणी प्रक्रियेला वेग; प्रलंबित प्रकरणांचा लवकर निपटारा होणार)

महिला आणि बालविकास विभागासाठी (Women and Child Development Department) सर्वाधिक ३१,९०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर ऊर्जा विभागासाठी २१,५३४ कोटी आणि सार्वजनिक बांधकाम-रस्ते विभागासाठी (सार्वजनिक उपक्रम वगळून) १९,०७९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (Ajit Pawar)

अन्य प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे:

जलसंपदा – १५,९३२ कोटी
ग्रामविकास – ११,४८० कोटी
नगरविकास – १०,६२९ कोटी
कृषी – ९,७१० कोटी
नियोजन – ९,०६० कोटी
इतर मागास बहुजन कल्याण – ४,३६८ कोटी
मृद व जलसंधारण – ४,२४७ कोटी
पाणीपुरवठा व स्वच्छता – ३,८७५ कोटी
सार्वजनिक आरोग्य – ३,८२७ कोटी
गृह (परिवहन) – ३,६१० कोटी
शालेय शिक्षण – २,९५९ कोटी
सामाजिक न्याय – २,९२३ कोटी
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये – २,५१७ कोटी
वने – २,५०७ कोटी
गृह – पोलीस – २,२३७ कोटी
नियोजन – रोजगार हमी योजना – २,२०५ कोटी
पर्यटन – १,९७३ कोटी
उच्च शिक्षण – ८१० कोटी
दिव्यांग कल्याण – १,५२६ कोटी
सार्वजनिक बांधकाम-रस्ते (सार्वजनिक उपक्रम) – ८५७ कोटी
तंत्र शिक्षण – २,२८८ कोटी
सार्वजनिक बांधकाम-इमारती – १,३६७ कोटी
सामान्य प्रशासन – १,२९९ कोटी
गृहनिर्माण – १,२४६ कोटी
सांस्कृतिक कार्य – १,१८६ कोटी
माहिती आणि तंत्रज्ञान – १,०५२ कोटी
उद्योग – १,०२१ कोटी
सहकार – ८५५ कोटी
अल्पसंख्याक विकास – ८१२ कोटी
विधी आणि न्याय – ७५९ कोटी
फलोत्पादन – ७०८ कोटी
मदत आणि पुनर्वसन – ६३८ कोटी
माहिती आणि जनसंपर्क – ५४७ कोटी
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय – ५४७ कोटी
क्रीडा – ५३७ कोटी
अन्न आणि नागरी पुरवठा – ५२६ कोटी
गृह – बंदरे – ४८४ कोटी
महसूल – ४७४ कोटी
लाभक्षेत्र विकास – ४११ कोटी
पणन – ३२३ कोटी

या तरतुदीमुळे राज्याच्या विकासाला नवे गतीमान स्वरूप मिळेल आणि विविध क्षेत्रातील प्रकल्पांना भक्कम आर्थिक पाठबळ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Budget 2025)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.