छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राज्यपाल भवनात करा, राज्यपाल महोदयांना जागा लागतेच किती? Udayanraje Bhosale आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राज्यपाल भवनात करा, राज्यपाल महोदयांना जागा लागतेच किती? Udayanraje Bhosale आक्रमक

61

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा आणण्याची मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली होती. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पण याप्रकरणी निवेदन दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री उद्या रायगड दौऱ्यावर असतानाच आता खासदार उदयनराजे यांनी अजून एक मोठी मागणी केली आहे. शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं अशी मागणी त्यांनी केली आहे. (Udayanraje Bhosale)

हेही वाचा-Jejuri च्या खंडोबा मंदिर आणि गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा

अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक व्हावं, अशी मागणी त्यांनी लावून धरली. जर अरबी समुद्रात स्मारक होणे शक्य नसेल तर मग राज्यपाल भवनात हे स्मारक व्हावं अशी मागणी त्यांनी केली. राज्यपाल भवनाची 48 एकर जमीन आहे. त्यामुळे राज्यपाल भवनात शिवरायांचं स्मारक व्हावे अशी मागणी त्यांनी केली. राज्यपाल महोदयांना जागा लागतेच किती? असा सवाल ही त्यांनी केला. (Udayanraje Bhosale)

हेही वाचा- PM Poshan Yojana अंतर्गत साहित्याच्या किंमतीत 9.50 टक्के वाढ

“उद्या शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. महापुरूषांबाबतीत जरा कोणी अपमानास्पद बोलत असेल तर यासाठी कायदा केला जावा. शिवाजी महाराज यांचा शासनामार्फत ग्रंथ प्रकाशित झाला नाही तो व्हावा. सेन्सार बोर्डात एक इतिहासकार असावा.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (Udayanraje Bhosale)

हेही वाचा- २६/११ चा खटला मुंबईत चालवला तर Tahawwur Rana ला कसाबच्या बॅरेक क्रमांक १२ मध्ये ठेवणार ?

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर उदयनराजे भोसले आक्रमक झाले. त्यांनी कुत्र्‍याची समाधी तात्काळ हटवण्याची मागणी केली. पैसे हे महाराजांच्या समाधीसाठी दिले होते असे ते म्हणाले. कुत्र्याच्या समाधीला दणका द्या असे ते म्हणाले. त्यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली. (Udayanraje Bhosale)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.