पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०१४पासून सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदार संघाची निवड केली आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा वाराणसीमधून खासदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले. अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात मोदी यांनी त्यांच्या संपत्तीबाबत आणि शिक्षणाबद्दल माहिती दिली आहे.
SBI मध्ये दोन खाती
प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान मोदींकडे (PM Narendra Modi) SBI मध्ये 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची FD आहे. 52 हजार रुपयांची रोकड आहे. याशिवाय SBI मध्ये दोन खाती आहेत. गुजरातच्या गांधीनगरमधील खात्यात 73 हजार 304 रुपये, तर वाराणसीमधील शिवाजी नगर शाखेत 7 हजार रुपये आहेत. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये मोदींची 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक आहे. जंगम मालमत्तेमध्ये सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. त्या अंगठ्यांचे वजन 45 ग्रॅम असून किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये इतकी आहे. मुख्य बाब म्हणजे, त्यांच्या नावावर स्वत:चे घर किंवा जमीन नाही. मोदी यांची एकूण संपत्ती सुमारे 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, मोदी यांनी 1967 मध्ये गुजरात बोर्डातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1978 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्स केले. पंतप्रधान मोदींनी 1983 मध्ये गुजरात विद्यापीठातून मास्टर्स ऑफ आर्ट्स केले.
Join Our WhatsApp Community