‘बंडोबाना थंड’ करण्याचे Mahayuti चे प्रयत्न किती सफल?  

123
‘बंडोबाना थंड’ करण्याचे Mahayuti चे प्रयत्न किती सफल?  
‘बंडोबाना थंड’ करण्याचे Mahayuti चे प्रयत्न किती सफल?  

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तशी राजकीय पक्षांना बंडखोरीची धास्ती वाटू लागली आहे. या बंडोबाना थंड करण्यासाठी राजकीय पक्षांनी उपाय म्हणून काही नाराज नेत्यांना महामंडळावर नियुक्ती करण्याचे प्रयत्न केले. गेल्या दोन दिवसात २७ महामंडळावर २७ नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात काही सफल होताना दिसत आहेत तर काही थंड होण्याचे नाव घेत नाहीत. (Mahayuti)

नवी मुंबईत चौगुले थंड

नवी मुंबईत शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदार संघाची उमेदवारी एकाच कुटुंबात देऊ नये, अशी मागणी करत भाजपाचे गणेश नाईक यांच्याविरुद्ध आवाज उठवला आणि उघड नाराजी व्यक्त केली. तसेच एकाच कुटुंबात दोन उमेदवाऱ्या दिल्या तर आपण काम करणार नाही, असा इशाराही दिला होता. (Mahayuti)

(हेही वाचा- ICC Hall of Fame : ॲलिस्टर कूक, एबी डिव्हिलिअर्स आणि नीतू डेव्हिड आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये)

यावर उपाय म्हणून शिंदे सरकारने चौगुले यांची नियुक्ती कै. मारुती चव्हाण वडार महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून केली. तसेच त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही दिला गेला. यानंतर चौगुले यांची नाराजी दूर झाल्याचे दिसून येत आहे. (Mahayuti)

महामंडळ नाकारले

दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या महामंडळावरील उपाध्यक्ष पद स्वकरण्यास स्पष्टपणे नकार दिला असून मावळ विधानसभा मतदार संघातून तिकीट मिळावे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. तर मावळमधून राष्ट्रवादीकडून सुनील शेळके यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीत मावळ मतदार संघात बंडखोरीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Mahayuti)

(हेही वाचा- Jammu and Kashmir ला राज्याचा दर्जा मिळणार ? काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?)

युतीकडून आघाडीकडे..  

भाजपाकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छूक असणारे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची महाराष्ट्र राज्य सहकार कृषि पणन मंडळावर अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. मात्र नाराज परिचारक महायुतीकडून महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा असून ते हातात ‘तुतारी’ घेउ शकतात, असे बोलले जात आहे.  (Mahayuti)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.