लोकसभा (Lok Sabha) व राज्यसभेच्या (Rajya Sabha) आजी-माजी खासदारांचे वेतन (MP salary) व भत्त्यांमध्ये तब्बल २४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सोमवारी (24 मार्च) केंद्र सरकारने (Central Govt) त्यासंदर्भात अधिसूचना जारी केली. खर्च महागाई निर्देशांकाच्या आधारे केलेल्या या वेतनवाढीमुळे संसद सदस्यांना दरमहा एक लाखाऐवजी १ लाख २४ हजार रुपये वेतन मिळेल. (MP salary)
दैनंदिन भत्ताही दोन हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये आणि माजी खासदारांचे निवृत्ती वेतन दरमहा २५ हजारहून ३१ हजार रुपये करण्यात आले आहे. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ संसदेचे सदस्य राहिलेल्या माजी खासदारांना त्यानंतरच्या सेवेसाठी प्रत्येक वर्षासाठी अतिरिक्त निवृत्तीवेतन प्रतिमहा २ हजारांवरून २ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे. यापूर्वी एप्रिल २०१८मध्ये खासदारांसाठी वेतन व भत्तावाढ करण्यात आली होती. (MP salary)
लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या (MP salary)
लोकसभा – एकूण सदस्य: ५४५ (सध्या ५४३)
निवडून आलेले सदस्य: ५४३ (लोकांनी थेट निवडून दिलेले)
नामनिर्देशित सदस्य: २ (राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले)
कार्यकाळ: ५ वर्षे
राज्यसभा – एकूण सदस्य: २५० (सध्या २४५)
निवडून आलेले सदस्य: २३३ (विधानसभा निवडून आलेले)
नामांकित सदस्य: १२ (कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून राष्ट्रपती निवडतात)
कार्यकाळ: ६ वर्षे (दर दोन वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community