America : मणिपूरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन; अमेरिकेतील अहवालानंतर भारताने सुनावले

249

अमेरिकेने (America) नुकताच मानवी हक्कांबाबतचा ‘ह्युमन राइट्स असेसमेंट रिपोर्ट’ नावाचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. यात भारतातील मणिपूरचा उल्लेख करून तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला. तसेच भारतभरात अल्पसंख्याक, पत्रकार आणि विरोधात उठणारा आवाज दाबला जात असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला सुनावले.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, अमेरिकेचा अहवाल पक्षपाती आणि भारताबद्दल तोकडे आकलन दर्शविणारा आहे. आम्ही या अहवालाला महत्त्व देत नाही आणि माध्यमांनीही देऊ नये, असे आवाहन करतो. मणिपूरमधील हिंसाचार थांबविण्यासाठी आणि तिथे मानवतावादी सहाय्य प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने विलंब केला, असा आरोप भारतातील स्थानिक मानवाधिकार संघटना, संघर्ष प्रभावित समाज आणि अल्पसंख्याकांच्या राजकीय पक्षांनी केला असल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. (America)

(हेही वाचा Gyanvapi Case प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना पुन्हा येऊ लागल्या धमक्या)

प्राप्तीकर विभागाने बीबीसी इंडियाच्या भारतातील कार्यालयावर टाकलेल्या छाप्यांचाही उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. त्यात म्हटले की, प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या कर आणि इतर वित्तीय बाबींमध्ये अनियमितता झाल्याचे सांगितले असले तरी संस्थेच्या आर्थिक प्रक्रियेत सहभागी नसलेल्या पत्रकारांकडून उपकरणे जप्त केली आहेत. (America)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.