महायुतीच्या वतीने देवेंद्र फडवणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे बुधवार, ४ डिसेंबर रोजी राज्यपालांना भेटले आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात जोरदार हास्यविनोद झाला. जेव्हा पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना ‘तुम्ही शपथ घेणार का’, असा प्रश्न केला, तेव्हा अजित पवार मध्येच म्हणाले, ‘यांचे संध्याकाळी समजेल पण मी तर शपथ घेणार आहे.’ त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘दादांना सकाळ आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव आहे’, असे म्हटले. त्यावर उपस्थितीतांमध्ये हास्या पिकाला. त्यावर ‘अजित पवारांनी (Ajit Pawar) सकाळी आम्ही दोघांनी शपथ घेतली होती ती राहून गेली होती, आता पाच वर्षांसाठी घेत आहोत’, असे म्हणत एकनाथ शिंदेंच्या म्हणण्यावर अजित पवारांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले.
(हेही वाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद आमच्यासाठी तांत्रिक व्यवस्था; Devendra Fadnavis यांनी मांडली भूमिका)
काय म्हणाले अजित पवार?
मागील दोन दिवस अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत होते, ते अधिकाधिक मंत्रीपदे मिळावीत म्हणून लॉबिंग करण्यासाठी दिल्लीत आहेत, अशा आशयाच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित होत होत्या, त्यावर खुलासा करताना अजित पवार म्हणाले, मी माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो, मी अमित शाह यांना भेटायला गेलो नव्हतो, माझी पत्नी सुनेत्रा पवार यांना जो बंगला दिला आहे, त्याची पाहणी करायला गेलो तसेच आमच्यावर ज्या केसेस सुरु आहेत त्या वकिलांना भेटण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. आमच्या पक्ष चिन्हाचा विषय अजून प्रलंबित आहे. तिथे गेल्यावर इथल्या पेक्षा आराम मिळतो, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. आम्ही सगळे जण मिळून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू. आम्ही आमच्या अनुभवाने राज्यातील सर्व घटकाला फायदा करून देऊ. अतिशय चांगले बहुमत आहे, त्यामुळे याला सांभाळा त्याला सांभाळा यासाठी वेळ देण्याची गरज भासणार नाही, आम्ही सरकारच्या वतीने सर्व कामे उत्तमरीत्या पार पाडू. दिलेली आश्वासने पूर्ण करून. राज्य क्रमांक एकचे करू, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community