पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे कायम स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सशस्त्र क्रांतीचे कार्य, देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग आणि समाजप्रबोधनाचे कार्य यांचा उल्लेख करत असते, मात्र मोदी सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाला त्याचा विसर पडला आहे. कारण मुंबईत आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आद्य-क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा विसर पडला.
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने मुंबईत ‘हुनर हाट’ नावाने कार्यक्रमाचे आयोजन केले. हा 40वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या घोषणेच्या अंतर्गत स्वदेशी वस्तू, खाद्यपदार्थ उपलब्ध केले जात आहेत.
Completely amazed and mesmerized by the Hunar (talent) displayed at the #hunarhaat !
Do visit and feel it, Mumbaikars !#Mumbai @hunarhaat pic.twitter.com/1ml8yxpJgR— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 18, 2022
या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांचे पुतळे आणि फोटो लावण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा फोटो टाकलेला नाही. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये जेथे प्रमुख नेत्यांचे फोटो दाखवण्यात आले, त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन शूर सुपुत्रांची आठवण करून देण्यास मोदी सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाला विसर पडतो, हे या मंत्रालयाचे दुर्दैव आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत ‘हुनर हाट’चे उद्घाटन करण्यात आले. या दोन्ही मंत्र्यांना भारतीय जनता पक्षाचा इतिहास परिचित आहे तसेच ते दोघे तळागाळातील राजकारणाशी समरस झालेले आहेत. तरीही मुंबई येथील कार्यक्रमात या दोन महान क्रांतिकारकांचा फोटो लावला न जाणे, यावरून केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाला याची ऍलर्जी आहे का, असा प्रश्न पडतो.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की जो परिकल्पना थी, उनकी सोच थी कि 'मेरा गांव मेरा देश', गांव में किस तरह से रोजगार के अवसर खड़े करने हैं, एक भारत श्रेष्ठ भारत को कैसे आगे लेकर जाना है। उस दिशा में अल्पसंख्यक मंत्रालय बढ़ चढ़ कर काम कर रहा है। @hunarhaat @naqvimukhtar pic.twitter.com/maHqLAkhvI
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) April 17, 2022
हुनर हाटमध्ये काय आहे?
40व्या ‘हुनर हाट’मध्ये 31 पेक्षा जास्त राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 1000 कारागीर, शिल्पकार सहभागी होत आहेत. लाकूड, दगड, चिकणमाती आणि इतर कृत्रिम साहित्यापासून बनवलेल्या रंगीबेरंगी बाहुल्यांसारख्या पारंपरिक खेळण्यांपासून ते डिझायनर बोर्ड गेम्स, कोडी आणि बरेच काही या प्रदर्शनात आहे.
Join Our WhatsApp Community